S M L

किल्लारीला 8 दिवसानंतर पाणी पुरवठा

15 एप्रिलभुकंपातून सावरलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीच्या गावकर्‍यांना 19 वर्षानंतरही पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. जीवन प्राधिकरणाकडून 1995 मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून अजुनही पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे किल्लारीच्या गावकर्‍यांना आठ दिवसातून एकदा पाणी मिळतंय. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर किल्लारीची समस्या मात्र अधिकच गंभीर आहे. भुकंपानंतर मदत मिळाली अनेक योजना सुरू झाल्या मात्र पाणीटंचाई काही दूर झाली नाही. दिवसातून किमान एक-दोन टँकरने प्रशासनाने पाणी पुरवठा करावा अशी आर्त मागणी किल्लारीकरांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2012 10:19 AM IST

किल्लारीला 8 दिवसानंतर पाणी पुरवठा

15 एप्रिल

भुकंपातून सावरलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीच्या गावकर्‍यांना 19 वर्षानंतरही पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. जीवन प्राधिकरणाकडून 1995 मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून अजुनही पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे किल्लारीच्या गावकर्‍यांना आठ दिवसातून एकदा पाणी मिळतंय. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर किल्लारीची समस्या मात्र अधिकच गंभीर आहे. भुकंपानंतर मदत मिळाली अनेक योजना सुरू झाल्या मात्र पाणीटंचाई काही दूर झाली नाही. दिवसातून किमान एक-दोन टँकरने प्रशासनाने पाणी पुरवठा करावा अशी आर्त मागणी किल्लारीकरांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2012 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close