S M L

काबूलमध्ये संसदेवर तालिबानी हल्ला, 16 ठार

15 एप्रिलअफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला चढवला आहे. काबूलमध्ये 12 बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याचं समजतंय. तसेच दहशतवाद्यांना संसदेवर रॉकेट हल्ला करुन संसदेत प्रवेश केला आहे. अमेरिका आणि ब्रिटीश दूतावास, ब्रिटीश राजदुताच्या घराला टार्गेट करून हा हल्ला करण्यात आला आहे. काबूलच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणाहून गोळीबार सुरू आहे. या भीषण हल्ल्याची तालिबानने जबाबदारी स्वीकारली. काबूलमधील भारतीय दूतावास मात्र सुरक्षित आहे. काहीवेळापुर्वीच जलालाबाद एअरपोर्टवरही अतिरेक्यांनी हल्ला चढवला आहे. तसेच दहशतवाद्यांनी मध्य काबूलमधील एका हॉटेलवर कब्जा केला आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.तसेच तालिबान ने ब्रिटीश,जर्मन दूतावास आणि नोटोच्या हेटक्वार्टरवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. अजूनही काही इमारतीतून धूर बाहेर पडत आहे. दहशतवाद्यांच्या निशान्यावर दूतावास होतेच पण यामध्ये एक मोठे 4 स्टार हॉटेलवर ही हल्ला चढवला आहे. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानूसार, ब्रिटीश दूतावासावर ग्रेनेट-रॉकेटने हल्ला चढवला. भारतीय दूतावासाकडून मिळालेल्या माहितीनुसार सगळे अधिकारी सुरुक्षित आहे. फेब्रुवारी महिन्यात अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या इमारतीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज हा सगळ्यात मोठा हल्ला झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2012 10:47 AM IST

काबूलमध्ये संसदेवर तालिबानी हल्ला, 16 ठार

15 एप्रिल

अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला चढवला आहे. काबूलमध्ये 12 बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याचं समजतंय. तसेच दहशतवाद्यांना संसदेवर रॉकेट हल्ला करुन संसदेत प्रवेश केला आहे. अमेरिका आणि ब्रिटीश दूतावास, ब्रिटीश राजदुताच्या घराला टार्गेट करून हा हल्ला करण्यात आला आहे. काबूलच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणाहून गोळीबार सुरू आहे. या भीषण हल्ल्याची तालिबानने जबाबदारी स्वीकारली. काबूलमधील भारतीय दूतावास मात्र सुरक्षित आहे. काहीवेळापुर्वीच जलालाबाद एअरपोर्टवरही अतिरेक्यांनी हल्ला चढवला आहे. तसेच दहशतवाद्यांनी मध्य काबूलमधील एका हॉटेलवर कब्जा केला आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच तालिबान ने ब्रिटीश,जर्मन दूतावास आणि नोटोच्या हेटक्वार्टरवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. अजूनही काही इमारतीतून धूर बाहेर पडत आहे. दहशतवाद्यांच्या निशान्यावर दूतावास होतेच पण यामध्ये एक मोठे 4 स्टार हॉटेलवर ही हल्ला चढवला आहे. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानूसार, ब्रिटीश दूतावासावर ग्रेनेट-रॉकेटने हल्ला चढवला. भारतीय दूतावासाकडून मिळालेल्या माहितीनुसार सगळे अधिकारी सुरुक्षित आहे. फेब्रुवारी महिन्यात अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या इमारतीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज हा सगळ्यात मोठा हल्ला झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2012 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close