S M L

सचिन आज खेळणार ?

16 एप्रिलमुंबई इंडियन्सची टीम सध्या चांगलीच फॉर्मात आहे. आणि आज त्यांची लढत आहे ती वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सशी.. दुखापतीतून सावरलेला सचिन तेंडुलकर या मॅचमध्ये पुनरागमन करतोय. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सोमवारी रात्री आठ वाजता ही मॅच रंगणार आहे. दुनिया हिला देंगे म्हणत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पाचव्या हंगामातही दमदार सुरुवात केली. चारपैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवत मुंबईने स्पर्धेतला आपला दबदबा कायम ठेवला. मुंबईची बॅटिंग आणि बॉलिंग चांगलीच जुळून आलीय. बॅटिंगमध्ये कायरन पोलार्ड , रोहित शर्मा, अंबाती रायडू यांना चांगली सुर गवसला आहे. तर बॉलिंगमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या यादीत मुंबईच्याच बॉलर्सचा बोलबाला आहे. लसिथ मलिंगा, मुनाफ पटेल आणि कायरन पोलार्डच्या भेदक बॉलिंगला सध्यातरी कोणत्याही टीमच्या बॅट्समनकडे उत्तर नाही. त्यातच मुंबईसाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दिल्लीविरुध्दच्या मॅचमध्ये मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. तब्बल 12 दिवसांनंतर सचिन टीममध्ये पुनरागमन करणार आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे सचिनला विश्रांती देण्यात आली होती. पण आता सचिन तेंडुलकरच्या समावेशामुळे मुंबई टीमची ओपनिंग बॅटिंगची समस्याही सुटणार आहे. पण दिल्लीची टीमही पूर्ण ताकतिनीशी या मॅचमध्ये उतरतेय. स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा वीरेंद्र सेहवाग वगळता फारसे परिचीत खेळाडू दिल्ली टीममध्ये नव्हते. पण महेला जयवर्धने आणि केविन पीटरसनच्या समावेशामुळे दिल्लीची बॅटिंग चांगलीच भक्कम बनली आहे. शिवाय ऑलराऊंडर इरफान पठाणही चांगलाच फॉर्मात आहे.बॉलिंगमध्ये तर मॉर्न मॉर्केल आणि उमेश यादवने याआधीच आपली छाप उमटवली. आणि मुंबईच्या भक्कम बॅटिंगला भगदाड पाडण्यासाठी ते सज्ज आहेत. आता घरच्या मैदानावर खेळणारी मुंबई इंडियन्स विजयाची मालिका कायम राखणार की दिल्ली डेअरडेव्हिल्स मुंबईला जोर का धक्का देणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2012 10:51 AM IST

सचिन आज खेळणार ?

16 एप्रिल

मुंबई इंडियन्सची टीम सध्या चांगलीच फॉर्मात आहे. आणि आज त्यांची लढत आहे ती वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सशी.. दुखापतीतून सावरलेला सचिन तेंडुलकर या मॅचमध्ये पुनरागमन करतोय. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सोमवारी रात्री आठ वाजता ही मॅच रंगणार आहे.

दुनिया हिला देंगे म्हणत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पाचव्या हंगामातही दमदार सुरुवात केली. चारपैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवत मुंबईने स्पर्धेतला आपला दबदबा कायम ठेवला.

मुंबईची बॅटिंग आणि बॉलिंग चांगलीच जुळून आलीय. बॅटिंगमध्ये कायरन पोलार्ड , रोहित शर्मा, अंबाती रायडू यांना चांगली सुर गवसला आहे. तर बॉलिंगमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या यादीत मुंबईच्याच बॉलर्सचा बोलबाला आहे. लसिथ मलिंगा, मुनाफ पटेल आणि कायरन पोलार्डच्या भेदक बॉलिंगला सध्यातरी कोणत्याही टीमच्या बॅट्समनकडे उत्तर नाही.

त्यातच मुंबईसाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दिल्लीविरुध्दच्या मॅचमध्ये मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. तब्बल 12 दिवसांनंतर सचिन टीममध्ये पुनरागमन करणार आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे सचिनला विश्रांती देण्यात आली होती. पण आता सचिन तेंडुलकरच्या समावेशामुळे मुंबई टीमची ओपनिंग बॅटिंगची समस्याही सुटणार आहे.

पण दिल्लीची टीमही पूर्ण ताकतिनीशी या मॅचमध्ये उतरतेय. स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा वीरेंद्र सेहवाग वगळता फारसे परिचीत खेळाडू दिल्ली टीममध्ये नव्हते. पण महेला जयवर्धने आणि केविन पीटरसनच्या समावेशामुळे दिल्लीची बॅटिंग चांगलीच भक्कम बनली आहे. शिवाय ऑलराऊंडर इरफान पठाणही चांगलाच फॉर्मात आहे.

बॉलिंगमध्ये तर मॉर्न मॉर्केल आणि उमेश यादवने याआधीच आपली छाप उमटवली. आणि मुंबईच्या भक्कम बॅटिंगला भगदाड पाडण्यासाठी ते सज्ज आहेत. आता घरच्या मैदानावर खेळणारी मुंबई इंडियन्स विजयाची मालिका कायम राखणार की दिल्ली डेअरडेव्हिल्स मुंबईला जोर का धक्का देणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2012 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close