S M L

सुनील प्रभूंनी मान्य केली लपवाछपवी

16 एप्रिलमुंबईचे महापौर सुनील प्रभू हे आपल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाची आणि प्रापॅर्टीच्या दिलेल्या माहितीवरुन अडचणीत आले आहे. आपलं खरं शिक्षण आणि मालमत्ता लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महापौरांनी मुंबईच्या दीड कोटी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप आज महापालिकेच्या सभागृहात विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी केला. विरोधी पक्ष नेत्यांसह राष्ट्रवादीचे गटनेते दादा पिसाळ, मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनीही हा विषय सभागृहात उचलून धरला. त्यामुळे या प्रकरणावर आतापर्यंत तोंड न उघडणार्‍या सुनील प्रभू यांना अखेर स्पष्टीकरण द्यावं लागलं. आपली कोंडी होत असल्याचं पाहून ही मालमत्ता वादग्रस्त असल्याने प्रतिज्ञापत्रात दाखवली नसल्याचे स्पष्टीकरण सुनील प्रभू यांनी दिलं. एकंदरीत कांदिवलीच्या मालमत्तेची मालकी त्यांना मान्य करावी लागली. पण मालमत्ता वादग्रस्त जरी असली तरी ताब्यातील मालमत्ता ही प्रतिज्ञापत्रात दाखवावीच लागते असं विधी तज्ञांचं मत आहे. दरम्यान, काल रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत क्लीन चिट नावाचा प्रकार नाही त्यामुळे प्रभू यांच्यावरील आरोप सिध्द झाले तर कारवाई करु असं आश्वासन दिलं होतं. आता खुद्द प्रभू यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे शिवसेना काय पाऊल उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2012 12:03 PM IST

सुनील प्रभूंनी मान्य केली लपवाछपवी

16 एप्रिल

मुंबईचे महापौर सुनील प्रभू हे आपल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाची आणि प्रापॅर्टीच्या दिलेल्या माहितीवरुन अडचणीत आले आहे. आपलं खरं शिक्षण आणि मालमत्ता लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महापौरांनी मुंबईच्या दीड कोटी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप आज महापालिकेच्या सभागृहात विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी केला. विरोधी पक्ष नेत्यांसह राष्ट्रवादीचे गटनेते दादा पिसाळ, मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनीही हा विषय सभागृहात उचलून धरला. त्यामुळे या प्रकरणावर आतापर्यंत तोंड न उघडणार्‍या सुनील प्रभू यांना अखेर स्पष्टीकरण द्यावं लागलं.

आपली कोंडी होत असल्याचं पाहून ही मालमत्ता वादग्रस्त असल्याने प्रतिज्ञापत्रात दाखवली नसल्याचे स्पष्टीकरण सुनील प्रभू यांनी दिलं. एकंदरीत कांदिवलीच्या मालमत्तेची मालकी त्यांना मान्य करावी लागली. पण मालमत्ता वादग्रस्त जरी असली तरी ताब्यातील मालमत्ता ही प्रतिज्ञापत्रात दाखवावीच लागते असं विधी तज्ञांचं मत आहे. दरम्यान, काल रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत क्लीन चिट नावाचा प्रकार नाही त्यामुळे प्रभू यांच्यावरील आरोप सिध्द झाले तर कारवाई करु असं आश्वासन दिलं होतं. आता खुद्द प्रभू यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे शिवसेना काय पाऊल उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2012 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close