S M L

मुंबई हायकोर्टातल्या भरतीत गैरप्रकाराचा आरोप

24 नोव्हेंबर, मुंबईसुधाकर कांबळेमुंबई हायकोर्टात झालेल्या भरतीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप या भरतीतील एक उमेदवार अभय राऊळ यांनी केला आहे. हायकोर्टासारख्या महत्वाच्या यंत्रणेवर प्रथमच असा आरोप झाला आहे.अभय राऊळ हे एक सुशिक्षित तरुण. मुंबई हायकोर्टातील सरकारी वकिलांच्या ऑफिसमध्ये दोन वर्षांपूर्वी क्लार्क पदासाठी भरती झाली होती. त्यावेळी अभय यांनी ही अर्ज केला होता. पण भरतीकरता एखाद्या पेपरमध्ये जाहिरात यायला हवी, पण तसं झालं नाही. मग इथूनच सुरु झाला मनमानी कारभार. 'या परीक्षेसाठी कोणताही जीआर काढला गेला नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त वर्तमानपत्रात जाहिरात दिली गेली नाही. ही सगळीच प्रक्रिया संशयास्पद आहे' असं अभय राऊळ यांनी सांगितलं.भरतीसाठी परीक्षा झाली. पण त्यातही गैरप्रकार. जागा होत्या 7, पण मेरिटलिस्ट 21 जणांची. यावेळी पहिल्या सात जणांना घ्यायला हवं होतं. पण 12 व्या, 18 व्या आणि 21 व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. 12 व्या क्रमांकावरील सुनिता वर्टेकर हिच्या इंग्रजी टायपिंगमध्ये 14 चुका होत्या, पण कोगदोपत्री पाचच चुका दाखवल्या. ती वेटिंग लीस्ट मध्ये दुसर्‍या क्रमांकावर असताना एक नंबरला डावलून तिला घेतलं. तिच्या गुणांमध्येही खाडाखोड करण्यात आली. 18 व्या क्रमांकावरील तृप्ती पाटील हिच्याकडं तर इंग्रजी आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेटच नाही. तिनं मराठी टायपिंग परीक्षाही दिली नाही. तरीही तिची निवड झाली आहे. 21 व्या क्रमांकावरील मंजिरी जाधव हिच्याकडं ही मराठी टायपिंग सर्टिफिकेट नाही. तिनं परीक्षाही दिली नाही. इंग्रजी मध्य तिनं21 चुका केल्या. पण पेपरवर चुका लिहिल्या गेल्या नाहीत. स्वाती दंडवते ही मेरिटलीस्टमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होती. पण इंग्रजीच्या पेपरमध्ये 14 चुका असताना केवळ 5 चुका लिहिल्या गेल्या. हा सर्व गैरप्रकार पचवण्यासाठी मग कागदपत्रांमध्ये खाडाखोड करण्यात आली. गुणवत्ता याद्या बनवल्या, गुणांमध्ये खाडाखोड केली. बनावट वेटिंगलिस्ट बनवली. 'संगणकात उमेदवारांनी टंकलिखित केलेला केलेला डेटा उपल्ब्ध नसल्याचं मला सांगण्यात आलं' असं अभय राऊळ यांनी सांगितलं. याबाबत परीक्षा कमिटीचे प्रमुखांशी संपर्क साधला असता, याबाबतचे माहिती अधिकारी पाटील यांनी आम्ही राऊळ यांनाही नोकरीवर घेणार होतो, पण त्यांनी नोकरी स्वीकारली नाही, असं सांगितलं. हा एक मोठा गैरप्रकार आहे. हायकोर्टासारख्या यंत्रणेत हा सुरु आहे. हा प्रकार उघडकीस आणायचा असल्यास ज्या कॉम्प्युटरवर परीक्षा घेण्यात आली. त्या कॉम्प्युटरची डि.एन.ए.चाचणी करायला हवी, अशी ही मागणी होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 04:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 04:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close