S M L

रिक्षाचालकांच्या संपाची प्रवाशांना शिक्षा

16 एप्रिलआज राज्यभरात रिक्षाचालकांनी दरवाढीसाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. मात्र नेहमीप्रमाणे रिक्षाचालकांच्या 'हट्टा'मुळे नागरिकांना हाल सहन करावे लागले. रिक्षांच्या भाडेवाढीमध्ये 1 रुपयांने वाढ करण्यात आली मात्र या दरवाढीवर असमाधानी दर्शवत रिक्षा युनियनने बेमुदत संपाचे हत्यार टाकून आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. आज सोमवार अर्थातच कर्मचार्‍यांसाठी 'वर्किंग डे' असतो. पण सकाळी घराबाहेर पडताच बस स्टॉपवर जमलेली गर्दी आणि खच्चाखच भरून वाहणार्‍या बस पाहून कर्मचारी डोक्याला हात लावून बसले. लोकल, टॅक्सी, खासगी वाहनांचा सहारा घेऊन कसे बसे अनेकांना आज ऑफिस गाठावे लागले पण संध्याकाळी दमुन थकून बाहेर पडलेल्या कर्मचार्‍यांना धक्के खात घरी परतावं लागलं आहे. संपाचा फटका हा कर्मचार्‍यांपुरता मर्यादित होता असा नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनाही पायपीट करत शाळेत उशीरा का होईना पोहचावे लागले. रिक्षाचालकांच्या संपावर फुकंर घालण्यासाठी बेस्टने जादा गाड्या सोडल्यात पण त्याही अपुर्‍या पडल्यात. कामगार नेते शरद राव यांनी बेमुदत संप मागे घेऊन एकदिवसाचा संप करुन काय साधले असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशी एकमेकांना विचारात रिक्षाचालकांवर संताप व्यक्त करत होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2012 12:34 PM IST

रिक्षाचालकांच्या संपाची प्रवाशांना शिक्षा

16 एप्रिल

आज राज्यभरात रिक्षाचालकांनी दरवाढीसाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. मात्र नेहमीप्रमाणे रिक्षाचालकांच्या 'हट्टा'मुळे नागरिकांना हाल सहन करावे लागले. रिक्षांच्या भाडेवाढीमध्ये 1 रुपयांने वाढ करण्यात आली मात्र या दरवाढीवर असमाधानी दर्शवत रिक्षा युनियनने बेमुदत संपाचे हत्यार टाकून आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. आज सोमवार अर्थातच कर्मचार्‍यांसाठी 'वर्किंग डे' असतो. पण सकाळी घराबाहेर पडताच बस स्टॉपवर जमलेली गर्दी आणि खच्चाखच भरून वाहणार्‍या बस पाहून कर्मचारी डोक्याला हात लावून बसले. लोकल, टॅक्सी, खासगी वाहनांचा सहारा घेऊन कसे बसे अनेकांना आज ऑफिस गाठावे लागले पण संध्याकाळी दमुन थकून बाहेर पडलेल्या कर्मचार्‍यांना धक्के खात घरी परतावं लागलं आहे. संपाचा फटका हा कर्मचार्‍यांपुरता मर्यादित होता असा नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनाही पायपीट करत शाळेत उशीरा का होईना पोहचावे लागले. रिक्षाचालकांच्या संपावर फुकंर घालण्यासाठी बेस्टने जादा गाड्या सोडल्यात पण त्याही अपुर्‍या पडल्यात. कामगार नेते शरद राव यांनी बेमुदत संप मागे घेऊन एकदिवसाचा संप करुन काय साधले असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशी एकमेकांना विचारात रिक्षाचालकांवर संताप व्यक्त करत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2012 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close