S M L

लवासावर 'कॅग'चे ताशेरे

17 एप्रिलकॅगच्या अहवालात लवासावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. कुठल्याही सखोल अभ्यासाशिवाय किंवा सर्वेक्षणाशिवाय पुणे जिल्ह्यात थंड हवेची ठिकाणं निश्चित केली गेली आणि लवासा कार्पोरेशनच्या प्रकल्प विकासकाच्या निवडीत कोणतीही पारदर्शकता नव्हती, असं कॅगनं म्हटलं आहे. या प्रकल्पास सार्वजनिक हिताऐवजी खाजगी हिताची जपणूक करण्यात आली. असाही ठपका यात ठेवण्यात आला आहे. 10 मंत्र्यांची पोलखोल करणार कॅगचा कॅगचा अहवाल काही वेळापूर्वीच विधिमंडळात सादर झाला. या अहवालात 10 मंत्र्यांवर ठपका ठेवण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालात मंत्र्यांवर ठपका ठेवल्याचा गौप्यस्फोट केला होता. सरकारने आज कॅगचा अहवाल विधानसभेत मांडण्याची औपचारिकता पूर्ण केली. पण या अहवालाच्या प्रति मात्र सदस्यांना देण्यात आल्या नाही. अहवालात भाषांतराच्या चुका असल्याचे सांगत सरकारने या अहवालाच्या प्रति सदस्यांना दिल्या नाही. कॅगच्या इंग्रजी आणि मराठी अहवालात फरक आहे. त्यामुळे त्यासाठी आता शुद्धपत्रिकातची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. दरम्यान कॅगचा मुळ अहवाल वेगळा आहे आणि फुटलेला अहवाल वेगळा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. फुटलेला अहवाल हा कटाचा भाग होता असा आरोपही त्यांनी केला.सरकारमधल्या अनेक मंत्र्यांच्या नातेवाईकांची नावं कॅगच्या अहवालात असल्यामुळेच सरकार हा अहवाल सादर करायला टाळाटाळ करतंय असा आरोप विरोधकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2012 09:28 AM IST

लवासावर 'कॅग'चे ताशेरे

17 एप्रिल

कॅगच्या अहवालात लवासावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. कुठल्याही सखोल अभ्यासाशिवाय किंवा सर्वेक्षणाशिवाय पुणे जिल्ह्यात थंड हवेची ठिकाणं निश्चित केली गेली आणि लवासा कार्पोरेशनच्या प्रकल्प विकासकाच्या निवडीत कोणतीही पारदर्शकता नव्हती, असं कॅगनं म्हटलं आहे. या प्रकल्पास सार्वजनिक हिताऐवजी खाजगी हिताची जपणूक करण्यात आली. असाही ठपका यात ठेवण्यात आला आहे. 10 मंत्र्यांची पोलखोल करणार कॅगचा कॅगचा अहवाल काही वेळापूर्वीच विधिमंडळात सादर झाला. या अहवालात 10 मंत्र्यांवर ठपका ठेवण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालात मंत्र्यांवर ठपका ठेवल्याचा गौप्यस्फोट केला होता.

सरकारने आज कॅगचा अहवाल विधानसभेत मांडण्याची औपचारिकता पूर्ण केली. पण या अहवालाच्या प्रति मात्र सदस्यांना देण्यात आल्या नाही. अहवालात भाषांतराच्या चुका असल्याचे सांगत सरकारने या अहवालाच्या प्रति सदस्यांना दिल्या नाही. कॅगच्या इंग्रजी आणि मराठी अहवालात फरक आहे. त्यामुळे त्यासाठी आता शुद्धपत्रिकातची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. दरम्यान कॅगचा मुळ अहवाल वेगळा आहे आणि फुटलेला अहवाल वेगळा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. फुटलेला अहवाल हा कटाचा भाग होता असा आरोपही त्यांनी केला.

सरकारमधल्या अनेक मंत्र्यांच्या नातेवाईकांची नावं कॅगच्या अहवालात असल्यामुळेच सरकार हा अहवाल सादर करायला टाळाटाळ करतंय असा आरोप विरोधकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2012 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close