S M L

भिवंडीत पराभूत नगरसेवकांच्या समर्थकांचा गोंधळ

16 एप्रिलभिवंडीच्या कामतघर इथं राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.भिवंडीच्या कामतघर इथं वॉर्ड क्र. 26 ब मधील सुरेश पाटील यांना शिवसेनेच्या नित्यानंद नाडर यांनी पराभूत केलं. आपल्या नगरसेवकाचा पराभव पाहून समर्थकांनी एकच गोंधळ घातला.जमावाला आवर घालण्यासाठी सीआरपीएफ (SRPF) च्या दलाने घटनास्थळाचा ताबा घेतला. पण ऐकणार ते कार्यकर्ते कोणते ? अखेर सीआरपीएफच्या जवानांना लाठीमार करावा लागला. सध्या भिवंडीत वातावरण निवळले असले तरी तणाव कायम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2012 08:51 AM IST

भिवंडीत पराभूत नगरसेवकांच्या समर्थकांचा गोंधळ

16 एप्रिल

भिवंडीच्या कामतघर इथं राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.भिवंडीच्या कामतघर इथं वॉर्ड क्र. 26 ब मधील सुरेश पाटील यांना शिवसेनेच्या नित्यानंद नाडर यांनी पराभूत केलं. आपल्या नगरसेवकाचा पराभव पाहून समर्थकांनी एकच गोंधळ घातला.जमावाला आवर घालण्यासाठी सीआरपीएफ (SRPF) च्या दलाने घटनास्थळाचा ताबा घेतला. पण ऐकणार ते कार्यकर्ते कोणते ? अखेर सीआरपीएफच्या जवानांना लाठीमार करावा लागला. सध्या भिवंडीत वातावरण निवळले असले तरी तणाव कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2012 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close