S M L

भुसावळजवळच्या गावात डायरीयाचे थैमान, 4 मृत्यू

16 एप्रिलभुसावळजवळच्या पिंप्री-शेकम गावात सध्या डायरीयाचे थैमान सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ही साथ सुरू आहे. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर आहेत. त्यांना वरणगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जवळपास गावातल्या प्रत्येक घरात रूग्ण असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गावात येणारे पिण्याचे पाणी दुषित असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केलीय. अनेक दिवसांपासून पाणी शुध्द करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी काल ग्रामपंचायतीचं कार्यालयही जाळलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2012 10:07 AM IST

भुसावळजवळच्या गावात डायरीयाचे थैमान, 4 मृत्यू

16 एप्रिल

भुसावळजवळच्या पिंप्री-शेकम गावात सध्या डायरीयाचे थैमान सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ही साथ सुरू आहे. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर आहेत. त्यांना वरणगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जवळपास गावातल्या प्रत्येक घरात रूग्ण असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गावात येणारे पिण्याचे पाणी दुषित असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केलीय. अनेक दिवसांपासून पाणी शुध्द करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी काल ग्रामपंचायतीचं कार्यालयही जाळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2012 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close