S M L

89 व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी रामदास कामत

24 नोव्हेंबर, मुंबई माधुरी निकुंभ यंदाचं 89 वं अखिल भारतीय नाट्यसंमेलन बीड इथे होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गायक, नट रामदास कामत यांची निवड झाली. त्याबाबतआयबीएन-लोकमतकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदास कामत म्हणाले -" साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याने मला कमालीचा आनंद होत आहे. गेली 40 वर्षं मी रंगभूमीची सेवा केलीये ती फळास आली आहे "या वर्षीच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून बरेच वाद निर्माण झाले होते. मात्र नियामक मंडळाच्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ गायक नट रामदास कामत यांची नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याचे जाहीर करण्यात आलीये. 1956- 57 मध्ये रामदास कामत यांनी रंगभूमीवर ' संगीत संश्यकल्लोळ ' या नाटकातून प्रवेश केला. आणि त्यानंतर ' संगीत शारदा ' , ' संगीत सौभद्र ' अशा बर्‍याच नाटकातून ते श्रोत्यांसमोर येत राहिले. हल्ली संगीत नाटकं फारशी चालत नाहीत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पण संगीत नाटकात गाण्याचे महत्त्व किती आणि कसं हे त्यांनी स्पष्ट केलं. '' संगीत नाटकात गाण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. गाणं आणि अभिनय दोन्ही बरोबरीने बघायला मिळतात. पण संगीत नाटकात कधी गाणं नाटकावर मात करत नाही, " असं रामदास कामत यांचं म्हणणं आहे. 2009 जानेवारीत 30 ,31 आणि 1 फेब्रुवारी असे तीन दिवस चालणारे हे नाट्यसंमेलन आनंदात आणि उत्साहात पार पडावं अशीच रामदास कामत आणि तमाम नाट्यरसिकांची इच्छा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 06:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 06:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close