S M L

1500 शाळांवर होणार फौजदारी कारवाई

18 एप्रिलअखेर बोगस पटसंख्या दाखवणार्‍या राज्यातल्या 1500 शाळांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यभरातल्या शाळांची पटपडताळणी केली होती. त्यात 10.16 टक्के बोगस विद्यार्थी आढळले होते. 20 ते 50 टक्के अनुपस्थिती गैरहजेरी असणार्‍या शाळांतल्या शिक्षक आणि कर्मचार्‍यांना दुसरीकडे पाठवण्यात येणार आहे. 50 टक्यांपेक्षा जास्त गैरहजेरी असलेल्या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच पटपडताळणीचे खोटे अहवाल देणार्‍या अधिकारर्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. मागिल वर्षी मोठा गाजावाजा करत राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळेत पटपडताळणी मोहिम राबवण्यात आली. मात्र या मोहिमेत अनेक गैर प्रकार उघडकीस आले. त्यामुळे 'शाळा' असली शाळा पाहुन राज्याला एकच धक्का दिला. आता तब्बल 1500 बोगस शाळांवर बोगस कारवाई होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2012 04:29 PM IST

1500 शाळांवर होणार फौजदारी कारवाई

18 एप्रिल

अखेर बोगस पटसंख्या दाखवणार्‍या राज्यातल्या 1500 शाळांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यभरातल्या शाळांची पटपडताळणी केली होती. त्यात 10.16 टक्के बोगस विद्यार्थी आढळले होते. 20 ते 50 टक्के अनुपस्थिती गैरहजेरी असणार्‍या शाळांतल्या शिक्षक आणि कर्मचार्‍यांना दुसरीकडे पाठवण्यात येणार आहे. 50 टक्यांपेक्षा जास्त गैरहजेरी असलेल्या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच पटपडताळणीचे खोटे अहवाल देणार्‍या अधिकारर्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. मागिल वर्षी मोठा गाजावाजा करत राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळेत पटपडताळणी मोहिम राबवण्यात आली. मात्र या मोहिमेत अनेक गैर प्रकार उघडकीस आले. त्यामुळे 'शाळा' असली शाळा पाहुन राज्याला एकच धक्का दिला. आता तब्बल 1500 बोगस शाळांवर बोगस कारवाई होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2012 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close