S M L

लोकलमधून पडून 3 जणांचा मृत्यू

19 एप्रिलमुंबईत सिग्नलला आग लागल्यामुळे कालपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय. लोकल अजूनही पूर्णपणे रुळावर आली नाही. त्यातच आज एक अपघाताची घटना घडली. या अपघातात 3 जणांचा बळी गेला.मुंबईमध्ये आज पुन्हा लाखो लोकांचा खोळंबा झाला. पण एका धक्कादायक घटनेत.. 3 जाणांचा बळी गेलाय्. नाहूर ते भांडुपदरम्यान लोकलला लटकलेल्या प्रवाशांना सिग्नलच्या खांबाची धडक बसली. यात चालत्या लोकलमधून दोघांचा पडून मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झालेत. ठाण्यातल्या सरलाबेन यांचं दुःख सांत्वन करण्यापलिकडचं आहे. त्यांचा 30 वर्षांचा मुलगा.. जितेन वारा.. गुरुवारी सकाळी घरातून निघाला. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती घरी तो घरी कधीच परतणार नाही. लोकलच्या दाराला लटकत असताना त्याचा अनपेक्षित मृत्यू झाला. भांडुप आणि नाहूरच्या मध्ये एका सिग्नलच्या खांबावर आदळून जितेन आणि इतर दोघे मृत्युमुखी पडले. तर 14 जणं जखमी झालेत. सर्व मृतांच्या नातेवाइकांना 2 लाखांची मदत देण्यात आली. सिग्नलच्या यंत्रणेचा काही भाग बाहेर आल्यामुळे हा अपघात झाला. असं प्रत्यक्षदर्शी आणि जखमींचं म्हणणं आहे. मात्र संबंधित रेल्वे कर्मचार्‍यांवर निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली. लग्नाची बेडीत अडकण्याअगोदर मृत्यूशी गाठ !या रेल्वेच्या अपघातात आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. प्रतीक छेडा असं त्याचं नाव आहे. त्याच्या लग्नाची तयारी छेडा कुटुंबीयांमध्ये सुरू होती. पण त्याला अखेरचा निरोप देण्याची दुदैर्वी वेळ कुटुंबीयांवर त्यांच्यावर आली. प्रतीक कोपरखैरणेत एका खासगी कंपनीत काम करत होता. आज कंपनीच्या कामासाठी तो डोंबिवलीहून सीएसटीला जात होता. त्यावेळी झालेल्या अपघातात त्याचा बळी गेला. प्रतीक घरातला एकमेव कमावता मुलगा होता. त्याच्या मृत्युमुळे आता छेडा कुटुंबीयांवर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 08:33 AM IST

लोकलमधून पडून 3 जणांचा मृत्यू

19 एप्रिल

मुंबईत सिग्नलला आग लागल्यामुळे कालपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय. लोकल अजूनही पूर्णपणे रुळावर आली नाही. त्यातच आज एक अपघाताची घटना घडली. या अपघातात 3 जणांचा बळी गेला.

मुंबईमध्ये आज पुन्हा लाखो लोकांचा खोळंबा झाला. पण एका धक्कादायक घटनेत.. 3 जाणांचा बळी गेलाय्. नाहूर ते भांडुपदरम्यान लोकलला लटकलेल्या प्रवाशांना सिग्नलच्या खांबाची धडक बसली. यात चालत्या लोकलमधून दोघांचा पडून मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झालेत. ठाण्यातल्या सरलाबेन यांचं दुःख सांत्वन करण्यापलिकडचं आहे. त्यांचा 30 वर्षांचा मुलगा.. जितेन वारा.. गुरुवारी सकाळी घरातून निघाला. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती घरी तो घरी कधीच परतणार नाही. लोकलच्या दाराला लटकत असताना त्याचा अनपेक्षित मृत्यू झाला.

भांडुप आणि नाहूरच्या मध्ये एका सिग्नलच्या खांबावर आदळून जितेन आणि इतर दोघे मृत्युमुखी पडले. तर 14 जणं जखमी झालेत. सर्व मृतांच्या नातेवाइकांना 2 लाखांची मदत देण्यात आली. सिग्नलच्या यंत्रणेचा काही भाग बाहेर आल्यामुळे हा अपघात झाला. असं प्रत्यक्षदर्शी आणि जखमींचं म्हणणं आहे. मात्र संबंधित रेल्वे कर्मचार्‍यांवर निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली.

लग्नाची बेडीत अडकण्याअगोदर मृत्यूशी गाठ !

या रेल्वेच्या अपघातात आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. प्रतीक छेडा असं त्याचं नाव आहे. त्याच्या लग्नाची तयारी छेडा कुटुंबीयांमध्ये सुरू होती. पण त्याला अखेरचा निरोप देण्याची दुदैर्वी वेळ कुटुंबीयांवर त्यांच्यावर आली. प्रतीक कोपरखैरणेत एका खासगी कंपनीत काम करत होता. आज कंपनीच्या कामासाठी तो डोंबिवलीहून सीएसटीला जात होता. त्यावेळी झालेल्या अपघातात त्याचा बळी गेला. प्रतीक घरातला एकमेव कमावता मुलगा होता. त्याच्या मृत्युमुळे आता छेडा कुटुंबीयांवर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 08:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close