S M L

पुण्यात मण्णपुरम फायनान्समध्ये 18 किलो सोनं चोरी

18 एप्रिलपुण्यातल्या मण्णपुरम फायनान्स लिमिटेडच्या भवानी पेठ कार्यालयात मोठी चोरी झालीय. तारण ठेवलेलं 18 किलो 45 ग्रॅम सोनं आणि 6 लाख 64 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. चोरट्यांनी सापळा रचत पहिले सुरक्षारक्षकाला निनावी फोन करून जागेवरून हटवलं. आणि यानंतर सिक्युरिटी सिस्टीमची वायर तोडली आणि डुप्लीकेट किल्लीने तिजोरी उघडून दरोडा टाकला. तसेच यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडली. तब्बल 18 किलो 45 ग्रॅम सोनं याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे साडेपाच ते सहा कोटी रुपये किंमत होते. मण्णपुरम फायनान्स ही कंपनी मागिल वर्षी सोनं तारणं ठेवून तातडीने रोख कर्ज देण्याची शक्कल घेऊन बाजारात उतरली. सोनं तारण ठेवून तातडीने कर्ज मिळत असल्यामुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरली. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर सोनं जमा होतं असल्यामुळे चोरांना याचा वास येणं साहजिक होतं. पण यासाठीही मोठ्या प्रमाणावर अध्यावत सुरक्षा यंत्रणाही सज्ज करण्यात आली होती. मात्र सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी तब्बल सहा कोटींचे सोने आणि रोख सहा लाख चोरी केले. विशेष म्हणजे चोरी ज्यावेळी होत होती तेंव्हा सुरक्षारक्षक चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता अशी माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2012 10:05 AM IST

पुण्यात मण्णपुरम फायनान्समध्ये 18 किलो सोनं चोरी

18 एप्रिल

पुण्यातल्या मण्णपुरम फायनान्स लिमिटेडच्या भवानी पेठ कार्यालयात मोठी चोरी झालीय. तारण ठेवलेलं 18 किलो 45 ग्रॅम सोनं आणि 6 लाख 64 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. चोरट्यांनी सापळा रचत पहिले सुरक्षारक्षकाला निनावी फोन करून जागेवरून हटवलं. आणि यानंतर सिक्युरिटी सिस्टीमची वायर तोडली आणि डुप्लीकेट किल्लीने तिजोरी उघडून दरोडा टाकला. तसेच यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडली.

तब्बल 18 किलो 45 ग्रॅम सोनं याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे साडेपाच ते सहा कोटी रुपये किंमत होते. मण्णपुरम फायनान्स ही कंपनी मागिल वर्षी सोनं तारणं ठेवून तातडीने रोख कर्ज देण्याची शक्कल घेऊन बाजारात उतरली. सोनं तारण ठेवून तातडीने कर्ज मिळत असल्यामुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरली. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर सोनं जमा होतं असल्यामुळे चोरांना याचा वास येणं साहजिक होतं. पण यासाठीही मोठ्या प्रमाणावर अध्यावत सुरक्षा यंत्रणाही सज्ज करण्यात आली होती. मात्र सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी तब्बल सहा कोटींचे सोने आणि रोख सहा लाख चोरी केले. विशेष म्हणजे चोरी ज्यावेळी होत होती तेंव्हा सुरक्षारक्षक चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता अशी माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2012 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close