S M L

कॅगने ठपका ठेवलेल्या संस्थाचालकांवर कारवाई व्हावी -अण्णा

19 एप्रिलसक्षम लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे महाराष्ट्र दिनापासून राज्यव्यापी दौरा काढत आहे. पण त्याआधी राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचं अण्णांनी सांगितले आहे. अण्णा हजारे 1 मे ते 5 जूनदरम्यान राज्याचा दौरा करणार आहेत. या महाराष्ट्र दौर्‍याआधी ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षांच्या नेत्यांना ते भेटतील. शिर्डीपासून सुरु होणारा दौरा राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून जाणार आहे. सक्षम लोकपाल आणि राज्यातील लोकायुक्तांसंदर्भात लोकांमध्ये ते जनजागृती करणार आहेत. भ्रष्टाचारावर सभागृहात चर्चा करण्याची विरोधकांची मागणी योग्य आहे. कॅगमध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या मंत्र्यांवर आणि संस्थाचालकांवर कायद्याने कारवाई करावी अशी मागणीही अण्णांनी केली आहे. पुण्यात सुरेश जैन यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्यासाठी अण्णा पुण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 09:03 AM IST

कॅगने ठपका ठेवलेल्या संस्थाचालकांवर कारवाई व्हावी -अण्णा

19 एप्रिल

सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे महाराष्ट्र दिनापासून राज्यव्यापी दौरा काढत आहे. पण त्याआधी राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचं अण्णांनी सांगितले आहे. अण्णा हजारे 1 मे ते 5 जूनदरम्यान राज्याचा दौरा करणार आहेत. या महाराष्ट्र दौर्‍याआधी ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षांच्या नेत्यांना ते भेटतील. शिर्डीपासून सुरु होणारा दौरा राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून जाणार आहे. सक्षम लोकपाल आणि राज्यातील लोकायुक्तांसंदर्भात लोकांमध्ये ते जनजागृती करणार आहेत. भ्रष्टाचारावर सभागृहात चर्चा करण्याची विरोधकांची मागणी योग्य आहे. कॅगमध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या मंत्र्यांवर आणि संस्थाचालकांवर कायद्याने कारवाई करावी अशी मागणीही अण्णांनी केली आहे. पुण्यात सुरेश जैन यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्यासाठी अण्णा पुण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 09:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close