S M L

आजही मध्य रेल्वेचा खोळंबा कायम

19 एप्रिलमुंबईत मध्य रेल्वेच्या सिग्नल पॅनेलला आग लागल्याने रेल्वे वाहतूक कोलमडलेली लोकल यंत्रणा आजही ट्रॅकवर येऊ शकलेली नाही. रेल्वेनं काल स्पष्ट केल्याप्रमाणे कुर्ला इथं दुरूस्तीचं काम सुरूच असल्याने आजही लोकल काही मिनिटं उशिरानं सुरू आहेत. डाऊन मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणा दुरूस्त झाली आहे. त्यामुळे सीएसटीहून निघणार्‍या गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पण सध्या सर्वच गाड्या सुमारे 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहे. सकाळी लोकलची परिस्थिती माहित नसल्याने लोकांनी स्टेशनवर येणं टाळल्याने सकाळी फारशी गर्दी नव्हती. पण आता स्टेशन्सवर गर्दी वाढायला लागली. दरम्यान, उद्या दुपारपर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होईल असा दावा रेल्वेने केलाय. आज लोकलच्या 90 फेर्‍या रद्द करण्यात आल्याची माहितीही रेल्वेचे पीआरओ विद्याधर मालेगावकर यांनी दिली. आगीचं कारण शोधून काढण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती नेमण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 10:00 AM IST

आजही मध्य रेल्वेचा खोळंबा कायम

19 एप्रिल

मुंबईत मध्य रेल्वेच्या सिग्नल पॅनेलला आग लागल्याने रेल्वे वाहतूक कोलमडलेली लोकल यंत्रणा आजही ट्रॅकवर येऊ शकलेली नाही. रेल्वेनं काल स्पष्ट केल्याप्रमाणे कुर्ला इथं दुरूस्तीचं काम सुरूच असल्याने आजही लोकल काही मिनिटं उशिरानं सुरू आहेत. डाऊन मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणा दुरूस्त झाली आहे. त्यामुळे सीएसटीहून निघणार्‍या गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पण सध्या सर्वच गाड्या सुमारे 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहे. सकाळी लोकलची परिस्थिती माहित नसल्याने लोकांनी स्टेशनवर येणं टाळल्याने सकाळी फारशी गर्दी नव्हती. पण आता स्टेशन्सवर गर्दी वाढायला लागली. दरम्यान, उद्या दुपारपर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होईल असा दावा रेल्वेने केलाय. आज लोकलच्या 90 फेर्‍या रद्द करण्यात आल्याची माहितीही रेल्वेचे पीआरओ विद्याधर मालेगावकर यांनी दिली. आगीचं कारण शोधून काढण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती नेमण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close