S M L

पाणीपुरवढा करणार्‍या टँकर मोजणीत गळती

19 एप्रिलपाणी टंचाईच्या झळा सोसणार्‍या पुणेकरांना पुणे महापालिका वारंवार पाणी बचतीचे सल्ले देत आहे. पण स्वतः मात्र त्याचं पालन करताना दिसताना दिसत नाही. हे स्पष्ट झालंय सजग नागरिक मंचाच्या एका शोध मोहीमेमुळे.पुण्यामध्ये अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पण हे टँकर जिथे भरले जातात तिथे या टँकरची नीट मोजणीच होत नाही. सजग नागरिक मंचाच्या वतीने एका दिवसामध्ये किती टँकर भरले जातात याची मोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण 34 टँकर भरले गेले असल्याचं स्पष्ट झालं. पण या ठिकाणी असलेल्या वहीमध्ये मात्र फक्त 28 टँकरचीच नोंद झाली होती. उरलेले 8 टँकर गेले तरी कुठे याची काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती. पुण्यामध्ये अशी एकूण 20 केंद्र आहेत. प्रत्येक ठिकाणी जर अशीच पाण्याची चोरी होत असेल तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकरांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणी तातडीने वॉटर मीटर बसवण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 10:05 AM IST

पाणीपुरवढा करणार्‍या टँकर मोजणीत गळती

19 एप्रिल

पाणी टंचाईच्या झळा सोसणार्‍या पुणेकरांना पुणे महापालिका वारंवार पाणी बचतीचे सल्ले देत आहे. पण स्वतः मात्र त्याचं पालन करताना दिसताना दिसत नाही. हे स्पष्ट झालंय सजग नागरिक मंचाच्या एका शोध मोहीमेमुळे.पुण्यामध्ये अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पण हे टँकर जिथे भरले जातात तिथे या टँकरची नीट मोजणीच होत नाही. सजग नागरिक मंचाच्या वतीने एका दिवसामध्ये किती टँकर भरले जातात याची मोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण 34 टँकर भरले गेले असल्याचं स्पष्ट झालं. पण या ठिकाणी असलेल्या वहीमध्ये मात्र फक्त 28 टँकरचीच नोंद झाली होती. उरलेले 8 टँकर गेले तरी कुठे याची काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती. पुण्यामध्ये अशी एकूण 20 केंद्र आहेत. प्रत्येक ठिकाणी जर अशीच पाण्याची चोरी होत असेल तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकरांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणी तातडीने वॉटर मीटर बसवण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close