S M L

डोन्ट वरी..फेरपरीक्षा होणार

19 एप्रिलकाल बुधवारी कुर्ला आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान लोकलच्या सिग्नलला लागलेल्या आगीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. लागलेल्या आगीमुळे प्रवाशांना चांगलेच चटके बसले. मात्र या गर्दी अडकलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेच्या कालच्या आणि आजच्या खोळंब्यामुळे पेपर बुडालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा विभागाने हा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. काल झालेल्या मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे अनेक विद्यार्थांची परिक्षा चुकली होती. त्यावर या विद्यार्थांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही असं मुंबई विद्यापीठाने आश्वासन दिलं होतं. त्याचप्रमाणे आज परीक्षा आणि मुल्यमापन विभागाचे संचालक डॉ. सुभाष देव यांनी पुनर्परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 12:10 PM IST

डोन्ट वरी..फेरपरीक्षा होणार

19 एप्रिल

काल बुधवारी कुर्ला आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान लोकलच्या सिग्नलला लागलेल्या आगीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. लागलेल्या आगीमुळे प्रवाशांना चांगलेच चटके बसले. मात्र या गर्दी अडकलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेच्या कालच्या आणि आजच्या खोळंब्यामुळे पेपर बुडालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा विभागाने हा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. काल झालेल्या मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे अनेक विद्यार्थांची परिक्षा चुकली होती. त्यावर या विद्यार्थांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही असं मुंबई विद्यापीठाने आश्वासन दिलं होतं. त्याचप्रमाणे आज परीक्षा आणि मुल्यमापन विभागाचे संचालक डॉ. सुभाष देव यांनी पुनर्परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close