S M L

अंधेरीत मित्रांनीच केली मित्राची हत्या

19 एप्रिलमुंबईतील अंधेरीमध्ये एका अकरावीच्या मुलाला त्याच्याच वर्गातील मित्रांनी बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. अंश अग्रवाल असं या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी त्याच्याच वर्गातील 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अंशच्या मैत्रिणीला या मुलांनी अश्लील एसएमएस (SMS) पाठवला होता. त्याला अंशने आक्षेप घेतल्यानंतर या 8 जणांनी अंशला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मागिल महिन्यातच पुण्यामध्ये 50 हजारांच्या खंडणीसाठी शुभम शिर्के या अल्पवयीन मुलाची त्याच्याच मित्रानी अपहरण करुन हत्या केली. शुभमची हत्या क्राईम सिरिअल पाहुन झाल्याची तपासातून पुढे आले होते. आता मुंबईत पुन्हा एकदा 11 वीत शिकणार्‍या अंश अग्रवालची त्याच आठ मित्रांनी हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 01:08 PM IST

अंधेरीत मित्रांनीच केली मित्राची हत्या

19 एप्रिल

मुंबईतील अंधेरीमध्ये एका अकरावीच्या मुलाला त्याच्याच वर्गातील मित्रांनी बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. अंश अग्रवाल असं या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी त्याच्याच वर्गातील 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अंशच्या मैत्रिणीला या मुलांनी अश्लील एसएमएस (SMS) पाठवला होता. त्याला अंशने आक्षेप घेतल्यानंतर या 8 जणांनी अंशला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मागिल महिन्यातच पुण्यामध्ये 50 हजारांच्या खंडणीसाठी शुभम शिर्के या अल्पवयीन मुलाची त्याच्याच मित्रानी अपहरण करुन हत्या केली. शुभमची हत्या क्राईम सिरिअल पाहुन झाल्याची तपासातून पुढे आले होते. आता मुंबईत पुन्हा एकदा 11 वीत शिकणार्‍या अंश अग्रवालची त्याच आठ मित्रांनी हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close