S M L

गिरणी कामगारांना साडे सात लाखांना घरं

20 एप्रिलगेल्या तीसवर्षापासून हक्काच्या घरासाठी लढा देणार्‍या गिरणी कामगारांना आज राज्य सरकारने दिलासा दिला आहे. गिरणी कामगारांसाठी घराच्या किंमतीमध्ये 10 टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना देण्यात येणारी आठ लाख किमतीची घरं आता साडे सात लाखांना मिळणार आहे. आज राज्य अर्थसकल्पीय अधिवेशनाची सांगता होतं आहे यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. येत्या मे महिन्याच्या अखेरीला लॉटरी पध्दतीने या घरांची सोडत निघणार आहे. मात्र 10 टक्क्यांची सवलत गिरणी कामगारांना कितपत योग्य ठरणार आहे हे लवकरच गिरणी कामगार संघटना स्पष्ट करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 12:01 PM IST

गिरणी कामगारांना साडे सात लाखांना घरं

20 एप्रिल

गेल्या तीसवर्षापासून हक्काच्या घरासाठी लढा देणार्‍या गिरणी कामगारांना आज राज्य सरकारने दिलासा दिला आहे. गिरणी कामगारांसाठी घराच्या किंमतीमध्ये 10 टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना देण्यात येणारी आठ लाख किमतीची घरं आता साडे सात लाखांना मिळणार आहे. आज राज्य अर्थसकल्पीय अधिवेशनाची सांगता होतं आहे यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. येत्या मे महिन्याच्या अखेरीला लॉटरी पध्दतीने या घरांची सोडत निघणार आहे. मात्र 10 टक्क्यांची सवलत गिरणी कामगारांना कितपत योग्य ठरणार आहे हे लवकरच गिरणी कामगार संघटना स्पष्ट करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close