S M L

युतीच्या 14 आमदारांचे निलंबन मागे

20 एप्रिलदिवेआगारच्या सुवर्णगणेश मूर्ती प्रकरणी विधानसभेत महाआरती करणार्‍या शिवसेना-भाजपच्या 14 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. सभागृहाची शिस्त पाळणार या अटीवर आज 14 निलंबित आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. यात शिवसेनेच्या 13 आणि भाजपच्या 1 आमदाराचा समावेश आहे. आज संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात प्रस्ताव पारीत केला. दिवेआगारची प्राचीन सुवर्णगणेश मूर्ती चोरीला गेल्यानंतर शिवसेनेकडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्याच्या दुसर्‍या दिवशी सेना आणि भाजपच्या आमदारांनी विधानसभेत याप्रकरणी चर्चा करण्याचा आग्रह धरला. मात्र पुढे काही ठरण्याअगोदरच शिवसेना-भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत गणपतीची मूर्ती घेऊन सभागृहात दाखल झाले. आणि काही कळण्या अगोदरच महाआरतीला सुरवात केली. आमदारांनी सभागृहाची शिस्त मोडल्यामुळे सेनेच्या 13 आणि भाजपच्या 1 आमदाराचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप होतं आहे. जाता-जाता संसदीय कामकाज मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात प्रस्ताव पारीत करुन 14 आमदारांचे निलंबन मागे घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 01:54 PM IST

युतीच्या 14 आमदारांचे निलंबन मागे

20 एप्रिल

दिवेआगारच्या सुवर्णगणेश मूर्ती प्रकरणी विधानसभेत महाआरती करणार्‍या शिवसेना-भाजपच्या 14 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. सभागृहाची शिस्त पाळणार या अटीवर आज 14 निलंबित आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. यात शिवसेनेच्या 13 आणि भाजपच्या 1 आमदाराचा समावेश आहे. आज संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात प्रस्ताव पारीत केला.

दिवेआगारची प्राचीन सुवर्णगणेश मूर्ती चोरीला गेल्यानंतर शिवसेनेकडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्याच्या दुसर्‍या दिवशी सेना आणि भाजपच्या आमदारांनी विधानसभेत याप्रकरणी चर्चा करण्याचा आग्रह धरला. मात्र पुढे काही ठरण्याअगोदरच शिवसेना-भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत गणपतीची मूर्ती घेऊन सभागृहात दाखल झाले. आणि काही कळण्या अगोदरच महाआरतीला सुरवात केली. आमदारांनी सभागृहाची शिस्त मोडल्यामुळे सेनेच्या 13 आणि भाजपच्या 1 आमदाराचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप होतं आहे. जाता-जाता संसदीय कामकाज मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात प्रस्ताव पारीत करुन 14 आमदारांचे निलंबन मागे घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close