S M L

योगेश्वरी मंदिरात चोरी प्रकरणी चोर मोकाटच

20 एप्रिलअंबेजोगाईच्या योगेश्वरी मंदिरात दरोडा पडून तीन दिवस उलटले तरीही अजून चोरट्यांचा शोध लागलेला नाही. देवीचे 50 तोळयाचे सोन्यांचे दागिने चोरीला गेले आहे. यामध्ये देवीच्या अंगावरील सर्व सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. देवीचे डोळे, कान आणि मुख, आणि देवीच्या चांदीच्या पादुकांचीही चोरी झाली आहे. या ऐतिहासिक मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे होते मात्र त्याची केबल कापून ही चोरी करण्यात आली. राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पोलिसांची शोधपथकं पाठवण्यात आलीत. पण अजूनही या घटनेचा तपास लागू शकलेला नाही. घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अंबेजोगाई शहरही बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, दिवेआगारची ऐतिहासिक गणेश मूर्ती चोरणारे अजूनही पकडण्यात आले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 02:12 PM IST

योगेश्वरी मंदिरात चोरी प्रकरणी चोर मोकाटच

20 एप्रिल

अंबेजोगाईच्या योगेश्वरी मंदिरात दरोडा पडून तीन दिवस उलटले तरीही अजून चोरट्यांचा शोध लागलेला नाही. देवीचे 50 तोळयाचे सोन्यांचे दागिने चोरीला गेले आहे. यामध्ये देवीच्या अंगावरील सर्व सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. देवीचे डोळे, कान आणि मुख, आणि देवीच्या चांदीच्या पादुकांचीही चोरी झाली आहे. या ऐतिहासिक मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे होते मात्र त्याची केबल कापून ही चोरी करण्यात आली. राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पोलिसांची शोधपथकं पाठवण्यात आलीत. पण अजूनही या घटनेचा तपास लागू शकलेला नाही. घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अंबेजोगाई शहरही बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, दिवेआगारची ऐतिहासिक गणेश मूर्ती चोरणारे अजूनही पकडण्यात आले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close