S M L

'मण्णपुरम'मध्ये चोरी व्यवस्थापकानेच केली, 2 जणांना अटक

19 एप्रिलपुण्यातल्या मण्णपुरम फायनान्स लिमिटेड कंपनीतल्या चोरीचा उलगडा केवळ 24 तासाच्या आत करण्यात पोलिसांना यश मिळालंय. या प्रकरणी कुपणानेच शेत खाल्याचं स्पष्ट झालंय. कंपनीचा सहायक व्यवस्थापक सोमनाथ वाघापुरे यानेच हा कट रचल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. सोमनाथ वाघापुरे सह त्याचा सहकारी तेजस भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. दोघाकडून 17 किलो 500 ग्रॅम सोनं आणि सहा लाख 64 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. या प्रकरणात नितीन उर्फ गोट्या गायकवाड आणि अकील उर्फ बबलू आंबेकर हे दोन आरोपी अजूनही फरार आहेत. काल बुधवारी भवानी पेठ येथील मण्णपुरम फायनान्स लिमिटेडच्या कार्यालयात तारण ठेवलेलं 18 किलो 45 ग्रॅम सोनं आणि 6 लाख 64 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मंगळवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. चोरट्यांनी सापळा रचत पहिले सुरक्षारक्षकाला निनावी फोन करून जागेवरून हटवलं. आणि यानंतर सिक्युरिटी सिस्टीमची वायर तोडली आणि डुप्लीकेट किल्लीने तिजोरी उघडून दरोडा टाकला. तसेच यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडली. तब्बल 18 किलो 45 ग्रॅम सोनं याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे साडेपाच ते सहा कोटी रुपये किंमत होते. विशेष म्हणजे चोरी ज्यावेळी होत होती तेंव्हा सुरक्षारक्षक चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता अशी माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे. आणि अखेर 24 तासांच्या आत पोलिसांची चोरीचा छडा लावला. कंपनीचा सहायक व्यवस्थापक सोमनाथ वाघापुरे यानेच हा कट रचल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. सोमनाथ वाघापुरेसह त्याचा सहकारी तेजस भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. चोरीला गेलेलं 17 किलो 500 ग्रॅम सोनं आणि सहा लाख 64 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त दोघाकडून करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 03:43 PM IST

'मण्णपुरम'मध्ये चोरी व्यवस्थापकानेच केली, 2 जणांना अटक

19 एप्रिल

पुण्यातल्या मण्णपुरम फायनान्स लिमिटेड कंपनीतल्या चोरीचा उलगडा केवळ 24 तासाच्या आत करण्यात पोलिसांना यश मिळालंय. या प्रकरणी कुपणानेच शेत खाल्याचं स्पष्ट झालंय. कंपनीचा सहायक व्यवस्थापक सोमनाथ वाघापुरे यानेच हा कट रचल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. सोमनाथ वाघापुरे सह त्याचा सहकारी तेजस भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. दोघाकडून 17 किलो 500 ग्रॅम सोनं आणि सहा लाख 64 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. या प्रकरणात नितीन उर्फ गोट्या गायकवाड आणि अकील उर्फ बबलू आंबेकर हे दोन आरोपी अजूनही फरार आहेत. काल बुधवारी भवानी पेठ येथील मण्णपुरम फायनान्स लिमिटेडच्या कार्यालयात तारण ठेवलेलं 18 किलो 45 ग्रॅम सोनं आणि 6 लाख 64 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मंगळवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. चोरट्यांनी सापळा रचत पहिले सुरक्षारक्षकाला निनावी फोन करून जागेवरून हटवलं. आणि यानंतर सिक्युरिटी सिस्टीमची वायर तोडली आणि डुप्लीकेट किल्लीने तिजोरी उघडून दरोडा टाकला. तसेच यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडली. तब्बल 18 किलो 45 ग्रॅम सोनं याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे साडेपाच ते सहा कोटी रुपये किंमत होते. विशेष म्हणजे चोरी ज्यावेळी होत होती तेंव्हा सुरक्षारक्षक चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता अशी माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे. आणि अखेर 24 तासांच्या आत पोलिसांची चोरीचा छडा लावला. कंपनीचा सहायक व्यवस्थापक सोमनाथ वाघापुरे यानेच हा कट रचल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. सोमनाथ वाघापुरेसह त्याचा सहकारी तेजस भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. चोरीला गेलेलं 17 किलो 500 ग्रॅम सोनं आणि सहा लाख 64 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त दोघाकडून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close