S M L

भ्रष्टाचारावर चर्चा टाळत अधिवेशन गुंडाळले

20 एप्रिलराज्य अर्थसंकल्प अधिवेशनाची आज सांगता झाली. कॅग अहवाल, आदर्श अहवालामुळे हे अधिवेशन गाजलं. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मात्र यात खडाजंगी चर्चा झाली नाही. विरोधकही भ्रष्टाराच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडायला अपयशी ठरले. विरोधकांना डावलून सरकारने काही निर्णय घेतले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता 9 जुलैपासून सुरु होणार आहे.कृपाशंकर सिंह यांचं बेहिशेबी मालमत्ता प्रकरणकॅगच्या अहवालात मंत्र्यांच्या ट्रस्टवर ताशेरे आणि आदर्शचा वादग्रस्त अहवालभ्रष्टाचाराचे असे अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती असतानाही विरोधक निष्प्रभ ठरले. कृपा प्रकरणावर अधिवेशनभर गप्प बसणार्‍या विरोधकांना अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी या मुद्द्याची आठवण झाली. पण एखाद दुसर्‍या भाषणाचा अपपवाद वगळता कृपांच्या प्रकरणाचा उल्लेख बहुतेक नेत्यांनी टाळला.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडायला विरोधकांना यश आलं नाही. भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना अनेकदा सत्ताधारी बाकावरून हरकती घेतल्या गेल्या. त्यामुळे ही चर्चा तांत्रिक मुद्द्यात अडकली. चर्चा सुरू असताना सत्ताधार्‍यांप्रमाणेच विरोधी बाकावरसुद्धा तुरळक उपस्थिती होती. शिवाय विरोधी पक्षांमध्येच समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची औपचारिकता पार पाडण्या पलिकडे अधिवेशनात काहीच झालं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 05:19 PM IST

भ्रष्टाचारावर चर्चा टाळत अधिवेशन गुंडाळले

20 एप्रिल

राज्य अर्थसंकल्प अधिवेशनाची आज सांगता झाली. कॅग अहवाल, आदर्श अहवालामुळे हे अधिवेशन गाजलं. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मात्र यात खडाजंगी चर्चा झाली नाही. विरोधकही भ्रष्टाराच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडायला अपयशी ठरले. विरोधकांना डावलून सरकारने काही निर्णय घेतले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता 9 जुलैपासून सुरु होणार आहे.

कृपाशंकर सिंह यांचं बेहिशेबी मालमत्ता प्रकरणकॅगच्या अहवालात मंत्र्यांच्या ट्रस्टवर ताशेरे आणि आदर्शचा वादग्रस्त अहवाल

भ्रष्टाचाराचे असे अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती असतानाही विरोधक निष्प्रभ ठरले. कृपा प्रकरणावर अधिवेशनभर गप्प बसणार्‍या विरोधकांना अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी या मुद्द्याची आठवण झाली. पण एखाद दुसर्‍या भाषणाचा अपपवाद वगळता कृपांच्या प्रकरणाचा उल्लेख बहुतेक नेत्यांनी टाळला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडायला विरोधकांना यश आलं नाही. भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना अनेकदा सत्ताधारी बाकावरून हरकती घेतल्या गेल्या. त्यामुळे ही चर्चा तांत्रिक मुद्द्यात अडकली.

चर्चा सुरू असताना सत्ताधार्‍यांप्रमाणेच विरोधी बाकावरसुद्धा तुरळक उपस्थिती होती. शिवाय विरोधी पक्षांमध्येच समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची औपचारिकता पार पाडण्या पलिकडे अधिवेशनात काहीच झालं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close