S M L

आर्थिकप्रश्नाबाबत सरकार असमर्थ - कौशिक बसू

20 एप्रिलआता आर्थिक सुधारणा ह्या केवळ लोकसभा निवडणुकांनतरच शक्य असल्याचे विधान केंद्राच्या अर्थखात्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी अमेरिकेत केलं. त्याचा अर्थ सध्याच्या राजकीय परिस्थितीत केंद्र सरकार आर्थिक सुधारणेबद्दलचा कुठलाही निर्णय घ्यायला असमर्थ आहे. असाच होत असल्याने त्यावर भारतात खळबळ माजली. शिवाय, भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमुळे तसेच अधिकारी महत्त्वाचे निर्णय घेताना धोका पत्करायला तयार नसल्याने आर्थिक विकासाचा वेग मंदावलाय असंही बसू म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर, भाजप आणि डाव्यांनी सरकारवर तोफ डागली. सरकारला धोरण ठरवण्याच्या बाबतीत अपयश येत असल्याचा आरोप भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी केला. तर, तर, बसू यांचं हे विधान गंभीरपणे घेण्याची गरज असल्याचं डाव्यांनी म्हटलंय. पण कौशिक बसू यांनी आता आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचं त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 05:59 PM IST

आर्थिकप्रश्नाबाबत सरकार असमर्थ - कौशिक बसू

20 एप्रिल

आता आर्थिक सुधारणा ह्या केवळ लोकसभा निवडणुकांनतरच शक्य असल्याचे विधान केंद्राच्या अर्थखात्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी अमेरिकेत केलं. त्याचा अर्थ सध्याच्या राजकीय परिस्थितीत केंद्र सरकार आर्थिक सुधारणेबद्दलचा कुठलाही निर्णय घ्यायला असमर्थ आहे. असाच होत असल्याने त्यावर भारतात खळबळ माजली. शिवाय, भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमुळे तसेच अधिकारी महत्त्वाचे निर्णय घेताना धोका पत्करायला तयार नसल्याने आर्थिक विकासाचा वेग मंदावलाय असंही बसू म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर, भाजप आणि डाव्यांनी सरकारवर तोफ डागली. सरकारला धोरण ठरवण्याच्या बाबतीत अपयश येत असल्याचा आरोप भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी केला. तर, तर, बसू यांचं हे विधान गंभीरपणे घेण्याची गरज असल्याचं डाव्यांनी म्हटलंय. पण कौशिक बसू यांनी आता आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचं त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close