S M L

मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

21 एप्रिलकाँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठ्या फेरबदलाचे वारे वाहु लागले आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली ती त्यासाठीच होती अशी चर्चा आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हे बदल तीन स्तरावर होऊ शकतात. एक मंत्रिमंडळ, दुसरा अनेक महामंडळावरील नियुकत्या आणि तिसरा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरील नियुक्ती. सध्या काँग्रेसच्या एकूण तीन जागा रिकाम्या आहेत. त्यामध्ये दोन कॅबिनेट आणि 1 राज्य मंत्रीपद आहे. या भरल्या जातानाच काही अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ देण्याचा निर्णयही पक्ष घेईल अशी जोरदार चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी ने शिवसेना आणि भाजपसोबत हात मिळवणी करुन विदर्भात काँग्रेसला झटका दिला. त्यामुळे आता काँग्रेस विदर्भात अधिक मंत्रीपद देऊ शकेल असं म्हटलं जातंय. शिवाय मराठवाड्यातही मंत्रीपद दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आपल्या सगळ्या महत्त्वाच्या महामंडळाला अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष न देता ती पदं रिकामी ठेवलेली होती. पण पक्षाच्या घसरत्या आलेखानंतर आता कार्यकर्त्यांना ही पदं दिल्यावाचून पर्याय नाही. अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. यात मुंबईत घर दुरुस्ती महामंडळ, प्रदूषण नियंत्रक महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ अशी अत्यंत महत्वाची महामंडळं आहेत. कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेली ही महामंडळं नाराज आमदारांना देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जाईल असं काँग्रेसमधल्या सुत्रांचं म्हणणं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद कृपाशंकर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर रिकामे आहे. या पदावर गुरुदास कामत विरुद्ध मुरली देवरा या गटांमध्ये नेहमीच चुरस आहे. यावेळचा चेहरा हा मराठी असावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यात देवरा गटाकडून एकनाथ गायकवाड आणि मधू चव्हाण आणि कामत गटाकडून चंद्रकांत हंडोरे आणि अशोक जाधव ही नावं दिली गेली आहे. राहुल गांधी येत्या 27 तारखेला मुंबईच्या दौर्‍यावर येत आहेत. त्या आधी हे अध्यक्षपदाचे नाव जाहीर केल जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांविरोधात महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसमध्ये वाढती नाराजी गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलीय. ती चर्चा शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून या विविध पातळीवरील नियुक्त्यांची चर्चा सुरु केली गेलीय अशी काँग्रेसमध्ये म्हटलं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2012 10:41 PM IST

मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

21 एप्रिल

काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठ्या फेरबदलाचे वारे वाहु लागले आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली ती त्यासाठीच होती अशी चर्चा आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हे बदल तीन स्तरावर होऊ शकतात. एक मंत्रिमंडळ, दुसरा अनेक महामंडळावरील नियुकत्या आणि तिसरा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरील नियुक्ती. सध्या काँग्रेसच्या एकूण तीन जागा रिकाम्या आहेत. त्यामध्ये दोन कॅबिनेट आणि 1 राज्य मंत्रीपद आहे.

या भरल्या जातानाच काही अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ देण्याचा निर्णयही पक्ष घेईल अशी जोरदार चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी ने शिवसेना आणि भाजपसोबत हात मिळवणी करुन विदर्भात काँग्रेसला झटका दिला. त्यामुळे आता काँग्रेस विदर्भात अधिक मंत्रीपद देऊ शकेल असं म्हटलं जातंय. शिवाय मराठवाड्यातही मंत्रीपद दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आपल्या सगळ्या महत्त्वाच्या महामंडळाला अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष न देता ती पदं रिकामी ठेवलेली होती. पण पक्षाच्या घसरत्या आलेखानंतर आता कार्यकर्त्यांना ही पदं दिल्यावाचून पर्याय नाही. अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे.

यात मुंबईत घर दुरुस्ती महामंडळ, प्रदूषण नियंत्रक महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ अशी अत्यंत महत्वाची महामंडळं आहेत. कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेली ही महामंडळं नाराज आमदारांना देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जाईल असं काँग्रेसमधल्या सुत्रांचं म्हणणं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद कृपाशंकर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर रिकामे आहे. या पदावर गुरुदास कामत विरुद्ध मुरली देवरा या गटांमध्ये नेहमीच चुरस आहे.

यावेळचा चेहरा हा मराठी असावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यात देवरा गटाकडून एकनाथ गायकवाड आणि मधू चव्हाण आणि कामत गटाकडून चंद्रकांत हंडोरे आणि अशोक जाधव ही नावं दिली गेली आहे. राहुल गांधी येत्या 27 तारखेला मुंबईच्या दौर्‍यावर येत आहेत. त्या आधी हे अध्यक्षपदाचे नाव जाहीर केल जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांविरोधात महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसमध्ये वाढती नाराजी गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलीय. ती चर्चा शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून या विविध पातळीवरील नियुक्त्यांची चर्चा सुरु केली गेलीय अशी काँग्रेसमध्ये म्हटलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2012 10:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close