S M L

जागतिक मंदीमुळे सलूनच्या धंद्यावरही संक्रांत

24 नोव्हेंबर, मुंबईऋतुजा मोरेजागतिक मंदीचा फटक्यापासून कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही. हेअर कटींग ही प्रत्येकाच्या जीवनातली आवश्यक गोष्ट. त्यासाठी बाजारात मोठमोठे प्रोफेशनल पार्लर्स उपलब्ध आहेत. पण त्यांचाही धंदा सध्या तीस ते चाळीस टक्के कमी होतोय.एक नवा प्रोफेशल लुक हा प्रत्येकाला हवा असतो. पण सध्या अनेकांना अनेकांना त्यातही कॉस्ट कटींग करावी लागत आहे. 'सध्या चांगल्या सलूमध्ये जाऊन हेअरकट करण्यापूर्वी मी विचार करतो' असं पंकजनं सांगितलं. तसं बघायला गेलं तर मंदी आणि हेअरकट यांचा कोणताही थेट संबंध दिसत नाही. पण मंदी म्हणलं की हातात येणारा पैसा कमी आणि त्याचा परिणाम लाईफस्टाईलवर होतोच. गेल्या दोन महिन्यात सलूनमध्ये येणार्‍या ग्राहकांची संख्या कमी झालीय. त्यामुळं ग्राहकांचं हे कॉस्ट कटींग लक्षात घेऊन हेअऱ ड्रेसर्संनीही स्वस्तात कटींगचा फॉर्म्युला काढलाय. 'आम्हाला बिझनेस वाढवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागत आहेत. आम्ही आता कस्टमर्सला वेगवेगळ्या ऑफर्स देतो. म्हणजे हेअर कलर केले की हेअर कट फ्री, स्टुडंट डिस्काउंट वगैरे वगैरे...' असं तुषार चव्हाण या हेअरड्रेसरनं सांगितलं. एकूणच मंदीची व्याप्ती फार मोठी आहे.पण त्याची झळ या छोट्याशा सलून इंडस्ट्रीलाही बसतेय, हेच यानिमित्तनं स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 06:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 06:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close