S M L

प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

23 एप्रिलराज्यातील दहा विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहेत. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे दहा महिन्याची थकबाकी आणि महागाई भत्याच्या फरकाची रक्कम देण्याची मागणी या प्राध्यापकांची आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिर्व्हीसिटी अँड कॉलेज टिचर्स या संघटनेशी संलग्न प्राध्यापक या बहिष्कारात सहभागी आहेत. आंदोलन असंच सुरु राहिल्यास उत्तरपत्रिका तपासणीचं काम रखडून त्याचे परिणाम निकाल लांबण्यावर होईल अशी भीती आहे. दरम्यान, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये, प्राध्यापकांच्या मागण्याबद्दल सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली आहे आणि प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचं काम ताबडतोब सुरु करावं असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2012 01:44 PM IST

प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

23 एप्रिल

राज्यातील दहा विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहेत. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे दहा महिन्याची थकबाकी आणि महागाई भत्याच्या फरकाची रक्कम देण्याची मागणी या प्राध्यापकांची आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिर्व्हीसिटी अँड कॉलेज टिचर्स या संघटनेशी संलग्न प्राध्यापक या बहिष्कारात सहभागी आहेत. आंदोलन असंच सुरु राहिल्यास उत्तरपत्रिका तपासणीचं काम रखडून त्याचे परिणाम निकाल लांबण्यावर होईल अशी भीती आहे. दरम्यान, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये, प्राध्यापकांच्या मागण्याबद्दल सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली आहे आणि प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचं काम ताबडतोब सुरु करावं असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2012 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close