S M L

अण्णांसमोर आता 'डॅमेज कंट्रोल'चे आव्हान

23 एप्रिलजनलोकपालच्या मुद्यावर पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यासाठी अण्णांनी रणशिंग फुंकलं असताना आता टीम अण्णांमध्येच मतभेद झालेत. बाबा रामदेव यांना सोबत घेण्यावरुन टीम अण्णांमध्ये नाराजी असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आंदोलन सुरू करण्यापुर्वी अण्णांना आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न करावे लागत आहे.मुफ्ती शमीन काझमी...टीम अण्णांमधला एकमेव मुस्लिम चेहरा. पण अण्णा पुन्हा बाबा रामदेवांच्या जवळ गेले आणि त्यानंतर झालेल्या बैठकीत.. काझमी टीममधून बाहेर पडले. त्यांनीही आरोप केलाय की टीम अण्णा आता धर्मनिरपेक्ष राहिली नाही. यापूर्वी स्वामी अग्निवेश यांना जेव्हा टीममधून काढण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी टीममध्ये लोकशाही नसल्याचा आरोप केला होता. अग्निवेश यांच्याप्रमाणे काझमीही चोरून बैठकांचं रेकॉर्डिंग करत होते, म्हणून त्यांना काढलं असा दावा टीम अण्णानं केला आहे. जर मी रेकॉर्ड केलं असेल, तर पारदर्शकतेचा आग्रह धरणार्‍या टीम अण्णाला एवढा राग का आला असा प्रश्नही काझमींनी विचारला. एकीकडे काझमींच्या जाण्यानं टीम फुटली असतानाच.. दुसरीकडे बाबा रामदेव यांना सोबत घेण्यावरुनही टीम अण्णांमध्ये नाराजी आहे.एवढे वाद असूनही अण्णा मात्र दावा करतायत.. की टीममध्येय सारं काही आलबेल आहे. अग्निवेश गेले, राजेंद्र सिंग गेले, पी बी राजगोलाल गेले, आता काझमी गेले, प्रशांत भूषण यांच्यावर अण्णा नाराज, तर मेधा पाटकर अण्णांवर नाराज. त्यामुळे गडही मिळाला नाहीये.य आणि सिंहही गेले.. अशी टीम अण्णाची स्थिती झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2012 02:56 PM IST

अण्णांसमोर आता 'डॅमेज कंट्रोल'चे आव्हान

23 एप्रिल

जनलोकपालच्या मुद्यावर पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यासाठी अण्णांनी रणशिंग फुंकलं असताना आता टीम अण्णांमध्येच मतभेद झालेत. बाबा रामदेव यांना सोबत घेण्यावरुन टीम अण्णांमध्ये नाराजी असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आंदोलन सुरू करण्यापुर्वी अण्णांना आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न करावे लागत आहे.

मुफ्ती शमीन काझमी...टीम अण्णांमधला एकमेव मुस्लिम चेहरा. पण अण्णा पुन्हा बाबा रामदेवांच्या जवळ गेले आणि त्यानंतर झालेल्या बैठकीत.. काझमी टीममधून बाहेर पडले. त्यांनीही आरोप केलाय की टीम अण्णा आता धर्मनिरपेक्ष राहिली नाही.

यापूर्वी स्वामी अग्निवेश यांना जेव्हा टीममधून काढण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी टीममध्ये लोकशाही नसल्याचा आरोप केला होता. अग्निवेश यांच्याप्रमाणे काझमीही चोरून बैठकांचं रेकॉर्डिंग करत होते, म्हणून त्यांना काढलं असा दावा टीम अण्णानं केला आहे.

जर मी रेकॉर्ड केलं असेल, तर पारदर्शकतेचा आग्रह धरणार्‍या टीम अण्णाला एवढा राग का आला असा प्रश्नही काझमींनी विचारला. एकीकडे काझमींच्या जाण्यानं टीम फुटली असतानाच.. दुसरीकडे बाबा रामदेव यांना सोबत घेण्यावरुनही टीम अण्णांमध्ये नाराजी आहे.

एवढे वाद असूनही अण्णा मात्र दावा करतायत.. की टीममध्येय सारं काही आलबेल आहे. अग्निवेश गेले, राजेंद्र सिंग गेले, पी बी राजगोलाल गेले, आता काझमी गेले, प्रशांत भूषण यांच्यावर अण्णा नाराज, तर मेधा पाटकर अण्णांवर नाराज. त्यामुळे गडही मिळाला नाहीये.य आणि सिंहही गेले.. अशी टीम अण्णाची स्थिती झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2012 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close