S M L

नाशिकमध्ये पोलिसांचा महिलांवर अमानुष लाठीमार

24 एप्रिलनाशिकमधल्या पांढुर्ली गावात पोलिसांनी महिलांवर अमानुष लाठीमार केलाय. तसेच पोलिसांनी घरांची आणि रिक्षांची तोडफोड केल्याचा आरोप होतोय. या ठिकाणी काल दोन गटांमध्ये दंगल झाली होती. त्यानंतर पोलिसांवरही दगडफेक झाल्याने लाठीमार करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षा पोलिसांनी फोडल्या, दारं फोडून घरातल्या सामानाची नासधूस केली असाही आरोप नागरिक करत आहे. महिला अधिकार्‍यांतर्फे या अत्याचाराची चौकशी सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2012 07:46 AM IST

नाशिकमध्ये पोलिसांचा महिलांवर अमानुष लाठीमार

24 एप्रिल

नाशिकमधल्या पांढुर्ली गावात पोलिसांनी महिलांवर अमानुष लाठीमार केलाय. तसेच पोलिसांनी घरांची आणि रिक्षांची तोडफोड केल्याचा आरोप होतोय. या ठिकाणी काल दोन गटांमध्ये दंगल झाली होती. त्यानंतर पोलिसांवरही दगडफेक झाल्याने लाठीमार करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षा पोलिसांनी फोडल्या, दारं फोडून घरातल्या सामानाची नासधूस केली असाही आरोप नागरिक करत आहे. महिला अधिकार्‍यांतर्फे या अत्याचाराची चौकशी सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2012 07:46 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close