S M L

सुवर्णगणेश मूर्ती चोरीप्रकरणी 4 जणांना अटक

24 एप्रिलदिवेआगारच्या प्राचीन सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणी अखेर पोलिसांना यश आलं आहे. अहमदनगरमध्ये सुवर्णगणेश मूर्तीची चोरी करणारे चारांना अटक करण्यात आली आहे. दिवेआगारच्या मंदिरात सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झालेल्या दोन चोरांचा यात समावेश आहे. चोरांनी चोरीची कबुली दिली आहे. चोरांकडून मूर्तीचे दागिने आणि अवशेष हस्तगत करण्यात आले आहेत. पुणे आणि रायगड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत हे यश हाती लागले आहे. सध्या चारही चोर पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सुवर्णगणेश मूर्ती सापडल्यामुळे दिवेआगारमध्ये गावकार्‍यांनी जल्लोष केला आहे.गेल्या 24 मार्चला दिवेआगारमधून प्राचीन सुवर्णगणेश मूर्तीची चोरी झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या अंधारात चोरांनी मंदिरात घुसून दीड किलो वजनाची मूर्ती चोरी केली आणि दोन्ही सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण केली. चोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. महिन्याभरापासून पोलीस चोरांच्या मागावर होते. दोनच आठवड्यापूर्वी औरंगाबादमधून सात संशयितांना अटक करण्यात आल्यामुळे चोरांचे पायमुळं जिल्ह्याभोवती फिरायला लागले. पुणे आणि रायगडच्या पोलीस पथकाने गटा-गटाने नगर,पुणे,औरंगाबादचा परिसर पिंजून काढला. आज पोलिसांना धडक कारवाई करत अहमदनगर येथील घोसपुरी येथे छापा टाकला आणि चार चोरांना ताब्यात घेतलं. चोरांकडून मूर्तीचे दागिने, अवशेष हस्तगत करण्यात आले आहे. चोरांनी चोरीची कबुली दिली आहे. या चार चोरांपैकी दोघे जण मंदिराच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तपास याच मागावर सुरु केला होता. अखेर आज पोलिसांनाच्या हाती यश लागले आहे. आपल्या गावाचे आराध्यदैवत सापडल्यामुळे दिवेआगारमध्ये गावकर्‍यांनी मंदिरात आरती करुन एकच जल्लोष केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2012 05:45 PM IST

सुवर्णगणेश मूर्ती चोरीप्रकरणी 4 जणांना अटक

24 एप्रिल

दिवेआगारच्या प्राचीन सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणी अखेर पोलिसांना यश आलं आहे. अहमदनगरमध्ये सुवर्णगणेश मूर्तीची चोरी करणारे चारांना अटक करण्यात आली आहे. दिवेआगारच्या मंदिरात सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झालेल्या दोन चोरांचा यात समावेश आहे. चोरांनी चोरीची कबुली दिली आहे. चोरांकडून मूर्तीचे दागिने आणि अवशेष हस्तगत करण्यात आले आहेत. पुणे आणि रायगड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत हे यश हाती लागले आहे. सध्या चारही चोर पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सुवर्णगणेश मूर्ती सापडल्यामुळे दिवेआगारमध्ये गावकार्‍यांनी जल्लोष केला आहे.

गेल्या 24 मार्चला दिवेआगारमधून प्राचीन सुवर्णगणेश मूर्तीची चोरी झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या अंधारात चोरांनी मंदिरात घुसून दीड किलो वजनाची मूर्ती चोरी केली आणि दोन्ही सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण केली. चोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. महिन्याभरापासून पोलीस चोरांच्या मागावर होते. दोनच आठवड्यापूर्वी औरंगाबादमधून सात संशयितांना अटक करण्यात आल्यामुळे चोरांचे पायमुळं जिल्ह्याभोवती फिरायला लागले. पुणे आणि रायगडच्या पोलीस पथकाने गटा-गटाने नगर,पुणे,औरंगाबादचा परिसर पिंजून काढला. आज पोलिसांना धडक कारवाई करत अहमदनगर येथील घोसपुरी येथे छापा टाकला आणि चार चोरांना ताब्यात घेतलं. चोरांकडून मूर्तीचे दागिने, अवशेष हस्तगत करण्यात आले आहे. चोरांनी चोरीची कबुली दिली आहे. या चार चोरांपैकी दोघे जण मंदिराच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तपास याच मागावर सुरु केला होता. अखेर आज पोलिसांनाच्या हाती यश लागले आहे. आपल्या गावाचे आराध्यदैवत सापडल्यामुळे दिवेआगारमध्ये गावकर्‍यांनी मंदिरात आरती करुन एकच जल्लोष केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2012 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close