S M L

जिल्हाधिकार्‍यांचे अपहरण प्रकरणी मध्यस्तीसाठी भूषण यांचा नकार

24 एप्रिलछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सुकमा जिल्हाधिकार्‍यांच्या सुटकेच्या बोलणीसाठी नक्षलवाद्यांनी 3 नावं सुचवली आहेत. यामध्ये टीम अण्णांचे सदस्य प्रशांत भूषण, बी.डी.शर्मा आणि मनिष कुजुम यांची नाव सुचवली आहे. पण प्रशांत भूषण यांनी मध्यस्थी करायला नकार दिला आहे. नक्षलवाद्यांनी जिल्हाधिकार्‍यांची विनाअट सुटका करण्याची मागणी प्रशांत भूषण यांनी केली आहे. जिल्हाधिकारी ऍलेक्स पॉल मेनन नेमके कुठे आहेत, याची माहिती पोलिसांना असल्याचं समजतंय. त्यांच्या आरोग्याबद्दल सरकारनं चिंता व्यक्त केलीय. शक्य तितक्या लवकर त्यांच्यासाठी औषधं पाठवण्याची सरकारची योजना आहे. मेनन यांचं नक्षलवाद्यांनी शनिवारी अपहरण केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2012 11:00 AM IST

जिल्हाधिकार्‍यांचे अपहरण प्रकरणी मध्यस्तीसाठी भूषण यांचा नकार

24 एप्रिल

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सुकमा जिल्हाधिकार्‍यांच्या सुटकेच्या बोलणीसाठी नक्षलवाद्यांनी 3 नावं सुचवली आहेत. यामध्ये टीम अण्णांचे सदस्य प्रशांत भूषण, बी.डी.शर्मा आणि मनिष कुजुम यांची नाव सुचवली आहे. पण प्रशांत भूषण यांनी मध्यस्थी करायला नकार दिला आहे. नक्षलवाद्यांनी जिल्हाधिकार्‍यांची विनाअट सुटका करण्याची मागणी प्रशांत भूषण यांनी केली आहे. जिल्हाधिकारी ऍलेक्स पॉल मेनन नेमके कुठे आहेत, याची माहिती पोलिसांना असल्याचं समजतंय. त्यांच्या आरोग्याबद्दल सरकारनं चिंता व्यक्त केलीय. शक्य तितक्या लवकर त्यांच्यासाठी औषधं पाठवण्याची सरकारची योजना आहे. मेनन यांचं नक्षलवाद्यांनी शनिवारी अपहरण केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2012 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close