S M L

जेट कर्मचार्‍यांच्या पगारात 25 टक्के कपात

24 नोव्हेंबर, मुंबई 1900 कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकण्याच्या वादग्रस्त निर्णयानंतर जेट एयरवेजचे सीईओ नरेश गोयल यांनी आता एक नवीन निर्णय घेतलाय. हवाईक्षेत्रात आलेल्या मंदीला तोंड देण्यासाठी यावेळी त्यांनी कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ज्युनियर कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकण्यार्‍या आणि त्यानंतर लगेचच हा निर्णय रद्द करणार्‍या नरेश गोयल यांनी आता जेट एयरवेजच्या कर्मचार्‍यांच्या पगारात कपात केली आहे. ही कपात अगदी वरिष्ठ पातळीवरच्या अधिकार्‍यांनाही लागू होणार आहे. टॉप मॅनेजमेंटमधील अधिकार्‍यांच्या पगारात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर पाच लाखांच्या वर पगार असणार्‍या अधिकार्‍यांच्या पगारात पाच ते दहा टक्के कपात केली जाणार आहे तसंच महिन्याला पाच लाखांपर्यंत पगार असणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारातही पाच टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. गोयल यांच्या या निर्णयाला पायलट्सचा मात्र विरोध आहे. यासंदर्भात पायलट संघटनेची बैठक आज होण्याची शक्यता आहे. पायलट्स आणि इंजिनियर यांच्या पगारात 10 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. महिन्याला 75 हजारांपर्यंत पगार घेणार्‍या कर्मचार्‍यांना मात्र ही कपात लागू होणार नाही. आता पायलट्स काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 11:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close