S M L

'त्या' कर्मचार्‍यांना वाचवण्यासाठी युनियनची धाव

25 एप्रिलमुंबईत मध्य रेल्वेची रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते. याच दरम्यान, लोकलला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे नाहूर जवळ रेल्वे सिग्नलला धडकून 3 प्रवाशी ठार झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत कुर्ला पोलिसांनी जबाबदार रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुध्द गुन्हा नोंदवला होता. पण आता या कर्मचार्‍यांना वाचवण्यासाठी रेल्वे युनियन मैदानात उतरली आहे. संबंधित कर्मचार्‍यांना अटक झाल्यास काम बंद करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे इशारा देणारे फलक लागले आहेत. पण या धमकीला न घाबरता नियमानुसार कारवाई करणार असल्याचं रेल्वे पोलीस अधिकार्‍यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2012 02:36 PM IST

'त्या' कर्मचार्‍यांना वाचवण्यासाठी युनियनची धाव

25 एप्रिल

मुंबईत मध्य रेल्वेची रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते. याच दरम्यान, लोकलला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे नाहूर जवळ रेल्वे सिग्नलला धडकून 3 प्रवाशी ठार झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत कुर्ला पोलिसांनी जबाबदार रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुध्द गुन्हा नोंदवला होता. पण आता या कर्मचार्‍यांना वाचवण्यासाठी रेल्वे युनियन मैदानात उतरली आहे. संबंधित कर्मचार्‍यांना अटक झाल्यास काम बंद करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे इशारा देणारे फलक लागले आहेत. पण या धमकीला न घाबरता नियमानुसार कारवाई करणार असल्याचं रेल्वे पोलीस अधिकार्‍यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2012 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close