S M L

शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

25 एप्रिलराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10 जनपथवर जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. सुमारे 40 मिनिटं चाललेल्या या बैठकीत दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल चर्चा केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे बहुमत नसल्यानं.. यूपीएतल्या मित्रपक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रपतीपद हे राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेल्या व्यक्तींकडे जावं असं मत पवारांनी व्यक्त केली होती.दरम्यान, या भेटीआधी राष्ट्रवादीने युपीए सरकारच्या धोरणांवर तोफ डागली. डिझेल, खत आणि विजेचे दर वाढवण्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे, असं राष्ट्रवादीचे खासदार डी पी त्रिपाठी यांनी सांगितलं. डिझेलचे दर वाढवण्याला यूपीएचा सहकारी पक्ष तृणमूल काँग्रेसनंही विरोध केला होता. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादीने 16 मेला दिल्लीत एका रॅलीचं आयोजन केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2012 02:40 PM IST

शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

25 एप्रिल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10 जनपथवर जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. सुमारे 40 मिनिटं चाललेल्या या बैठकीत दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल चर्चा केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे बहुमत नसल्यानं.. यूपीएतल्या मित्रपक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रपतीपद हे राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेल्या व्यक्तींकडे जावं असं मत पवारांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, या भेटीआधी राष्ट्रवादीने युपीए सरकारच्या धोरणांवर तोफ डागली. डिझेल, खत आणि विजेचे दर वाढवण्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे, असं राष्ट्रवादीचे खासदार डी पी त्रिपाठी यांनी सांगितलं. डिझेलचे दर वाढवण्याला यूपीएचा सहकारी पक्ष तृणमूल काँग्रेसनंही विरोध केला होता. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादीने 16 मेला दिल्लीत एका रॅलीचं आयोजन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2012 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close