S M L

मुंबई विद्यापीठाचा पुन्हा गलथान कारभार

25 एप्रिलमुंबई विद्यापीठात पुन्हा एकदा पेपर फुटी झाल्याचं समोर आलं आहे. आज बीएमएसचा पेपर फुटला त्यामुळे ऐनवेळी प्रश्नपत्रिका बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे आज बीएमएस चा पेपर दीड तासानंतर सुरु झाला. मात्र विद्यापीठाने पेपर फुटलाच नाही, असा आधी दावा केला. पण नंतर चौकशीसाठी 3 सदस्यांची समिती नेमली आहे. या समिती प्रा. एस.टी गडदे, प्रकाश वाणी आणि दिनेश संजीवन हे या समितीत असतील. इंटरनेटच्या माधमातून हा पेपर 49 परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आला होता. पण पेपर पाठवण्यास उशीर झाल्याने पेपरला उशीर झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा विभागाचे संचालक सुभाष देव यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2012 02:54 PM IST

मुंबई विद्यापीठाचा पुन्हा गलथान कारभार

25 एप्रिल

मुंबई विद्यापीठात पुन्हा एकदा पेपर फुटी झाल्याचं समोर आलं आहे. आज बीएमएसचा पेपर फुटला त्यामुळे ऐनवेळी प्रश्नपत्रिका बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे आज बीएमएस चा पेपर दीड तासानंतर सुरु झाला. मात्र विद्यापीठाने पेपर फुटलाच नाही, असा आधी दावा केला. पण नंतर चौकशीसाठी 3 सदस्यांची समिती नेमली आहे. या समिती प्रा. एस.टी गडदे, प्रकाश वाणी आणि दिनेश संजीवन हे या समितीत असतील. इंटरनेटच्या माधमातून हा पेपर 49 परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आला होता. पण पेपर पाठवण्यास उशीर झाल्याने पेपरला उशीर झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा विभागाचे संचालक सुभाष देव यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2012 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close