S M L

पाण्यासाठी बळी गेल्यानंतर सरकारची धावाधाव

26 एप्रिलमोखाडा तालुक्यातल्या डोलारा गावात पाण्यासाठी महिलेचा बळी गेल्यावर राज्य सरकारला जाग आली आहे. आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी पार्वती जाधव या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तर पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या ठाणे जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई असून शासनाने जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत यांचा समावेशच नाही. डोलारे सारख्या गावात फक्त यंदाच नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची टंचाई आहे, पाणी पुरवठ्याची एकही योजना नाही. याचा आढावा घेऊन तातडीने पाणीपुरवठा योजनांची आखणी करण्यात आली. उदासीन अधिकार्‍यांची यावेळी कानउघडणी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2012 05:03 PM IST

पाण्यासाठी बळी गेल्यानंतर सरकारची धावाधाव

26 एप्रिल

मोखाडा तालुक्यातल्या डोलारा गावात पाण्यासाठी महिलेचा बळी गेल्यावर राज्य सरकारला जाग आली आहे. आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी पार्वती जाधव या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तर पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या ठाणे जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई असून शासनाने जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत यांचा समावेशच नाही. डोलारे सारख्या गावात फक्त यंदाच नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची टंचाई आहे, पाणी पुरवठ्याची एकही योजना नाही. याचा आढावा घेऊन तातडीने पाणीपुरवठा योजनांची आखणी करण्यात आली. उदासीन अधिकार्‍यांची यावेळी कानउघडणी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2012 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close