S M L

आपला सचिन आता खासदार बनणार

26 एप्रिलआता मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरची ओळख खासदार सचिन रमेश तेंडुलकर अशी होणार आहे. सचिनने राज्यसभेची उमेदवारी स्वीकारली आहे अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे मास्टर ब्लास्टरची मैदानतली 'फटकेबाजी' आता राज्यसभेत पाहायला मिळणार आहे. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सचिनच्या राज्यसभेतील जागेसाठी शिफारस केली आहे. गृहमंत्रालयाने चार नावांची शिफारस केली आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरसह अभिनेत्री रेखा, उद्योजक अनु आगा यांचा समावेश आहे. आणि राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही संध्याकाळी केंद्राच्या शिफारसीवर शिक्कामोर्तब केलं. आज सकाळी सचिन तेंडुलकरने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अंजलीही होती. सोनिया गांधी यांनी सचिनच्या महाशतकाबद्दल शुभेच्छा दिल्यात तसेच वाढदिवसाबद्दलही शुभेच्छा दिल्यात. यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्कला उपस्थित होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनला काही दिवसांपूर्वीच निमंत्रित खासदार बनण्याची ऑफर देण्यात आली होती. आज सोनिया गांधी यांना भेटून सचिनने उमेदवारीचा स्वीकार केला असल्याचं सांगितलं. सचिन सध्या आयपीएलच्या मॅचसाठी दिल्लीत आला आहे. शुक्रवारी फिरोज शहा कोटाला मैदानावर मुंबई इंडियन्सची दिल्ली सोबत सामना होणार आहे.विशेष म्हणजे राज्यसभेसाठी काही सदस्य सरकारच्या मागणीवर राष्ट्रपतींव्दारे निमंत्रित केली जातात. हे यासाठी केले जाते की, काही खास क्षेत्रातील लोक ज्यांचे त्यांच्या क्षेत्रात विशेष योगदान आहे. आणि त्यांच्या योग्यतेमुळे संसदेला त्यांच्या कर्तृत्वाचा फायदा होईल. काँग्रेसने सचिन तेंडुलकर अभिनेत्री रेखा, उद्योजक अनु आगा यांचे नाव सुचवले आहे. यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गृहमंत्रालयाला याबाबत पत्र पाठवले आहे. तर दुसरीकडे सचिनच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सचिनने राजकारणात जाऊ नये अशी प्रतिक्रिया फेसबुक,टिवट्‌रवर दिल्या आहे. पण सचिनने राजकारणात येण्याचंही चाहत्यांनी मनापासून स्वागत केलं आहे. आता मैदानाबाहेरची सचिनची इनिंग कशी असणार हे पाहण्याचे ठरेल.राजकारणात उतरणार सचिन पहिला नाही !

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2012 12:45 PM IST

आपला सचिन आता खासदार बनणार

26 एप्रिल

आता मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरची ओळख खासदार सचिन रमेश तेंडुलकर अशी होणार आहे. सचिनने राज्यसभेची उमेदवारी स्वीकारली आहे अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे मास्टर ब्लास्टरची मैदानतली 'फटकेबाजी' आता राज्यसभेत पाहायला मिळणार आहे. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सचिनच्या राज्यसभेतील जागेसाठी शिफारस केली आहे. गृहमंत्रालयाने चार नावांची शिफारस केली आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरसह अभिनेत्री रेखा, उद्योजक अनु आगा यांचा समावेश आहे. आणि राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही संध्याकाळी केंद्राच्या शिफारसीवर शिक्कामोर्तब केलं.

आज सकाळी सचिन तेंडुलकरने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अंजलीही होती. सोनिया गांधी यांनी सचिनच्या महाशतकाबद्दल शुभेच्छा दिल्यात तसेच वाढदिवसाबद्दलही शुभेच्छा दिल्यात. यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्कला उपस्थित होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनला काही दिवसांपूर्वीच निमंत्रित खासदार बनण्याची ऑफर देण्यात आली होती. आज सोनिया गांधी यांना भेटून सचिनने उमेदवारीचा स्वीकार केला असल्याचं सांगितलं. सचिन सध्या आयपीएलच्या मॅचसाठी दिल्लीत आला आहे. शुक्रवारी फिरोज शहा कोटाला मैदानावर मुंबई इंडियन्सची दिल्ली सोबत सामना होणार आहे.

विशेष म्हणजे राज्यसभेसाठी काही सदस्य सरकारच्या मागणीवर राष्ट्रपतींव्दारे निमंत्रित केली जातात. हे यासाठी केले जाते की, काही खास क्षेत्रातील लोक ज्यांचे त्यांच्या क्षेत्रात विशेष योगदान आहे. आणि त्यांच्या योग्यतेमुळे संसदेला त्यांच्या कर्तृत्वाचा फायदा होईल. काँग्रेसने सचिन तेंडुलकर अभिनेत्री रेखा, उद्योजक अनु आगा यांचे नाव सुचवले आहे. यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गृहमंत्रालयाला याबाबत पत्र पाठवले आहे.

तर दुसरीकडे सचिनच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सचिनने राजकारणात जाऊ नये अशी प्रतिक्रिया फेसबुक,टिवट्‌रवर दिल्या आहे. पण सचिनने राजकारणात येण्याचंही चाहत्यांनी मनापासून स्वागत केलं आहे. आता मैदानाबाहेरची सचिनची इनिंग कशी असणार हे पाहण्याचे ठरेल.

राजकारणात उतरणार सचिन पहिला नाही !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2012 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close