S M L

पंजाबचा चेन्नईवर 'सुपर' विजय

28 एप्रिलकिंग्ज इलेव्हन पंजाबने महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का दिला आहे. गतविजेत्या चेन्नईला या हंगामात अजूनही लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नई सुपरचा 9 मॅचमधला हा चौथा पराभव ठरला आहे. ओपनर मनदीप सिंगने केलेल्या हाफसेंच्युरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 156 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. याला उत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जनं सुरुवात दमदार केली. ड्यू प्लेसिस आणि एस बद्रीनाथने पहिल्या विकेटसाठी 47 रन्सची पार्टनरशिप केली. पण ही जोडी आऊट झाली आणि चेन्नईची मधली फळी झटपट कोसळली. सुरेश रैना, महेद्रसिंग धोणी आणि रविंद्र जडेजा मैदानावर हजेरी लावून गेले. डवेन ब्राव्होनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत रंगत निर्माण केली. पण चेन्नई विजयासाठी 7 रन्स कमी पडले. पंजाबतर्फे अझर मेहमुदनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2012 04:40 PM IST

पंजाबचा चेन्नईवर 'सुपर' विजय

28 एप्रिल

किंग्ज इलेव्हन पंजाबने महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का दिला आहे. गतविजेत्या चेन्नईला या हंगामात अजूनही लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नई सुपरचा 9 मॅचमधला हा चौथा पराभव ठरला आहे. ओपनर मनदीप सिंगने केलेल्या हाफसेंच्युरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 156 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. याला उत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जनं सुरुवात दमदार केली. ड्यू प्लेसिस आणि एस बद्रीनाथने पहिल्या विकेटसाठी 47 रन्सची पार्टनरशिप केली. पण ही जोडी आऊट झाली आणि चेन्नईची मधली फळी झटपट कोसळली. सुरेश रैना, महेद्रसिंग धोणी आणि रविंद्र जडेजा मैदानावर हजेरी लावून गेले. डवेन ब्राव्होनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत रंगत निर्माण केली. पण चेन्नई विजयासाठी 7 रन्स कमी पडले. पंजाबतर्फे अझर मेहमुदनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close