S M L

दुष्काळग्रस्त 42 गावांचा राज्याला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा

30 एप्रिलराज्यात दुष्काळाची परिस्थिती चिघळत चालली आहे. पण सरकार फक्त आश्वासनांचं गाजर दाखवून आपली जबाबदारी पार पाडल्याचा आव आणत असल्याचंच चित्र आहे. सरकारच्या या वागण्याला कंटाळलेल्या सांगलीतल्या जत तालुक्यातली 42 गावं आता महाराष्ट्रालाच सोडचिठ्ठी देण्याचा विचार करत आहे. या गावांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. पाझर तलाव कोरडे पडून दोन महिने झालेत, विहिरी आणि बोरही कोरडे पडलेत. माणसालाच प्यायला पाणी मिळत नाही. तशीच जनावरांची परिस्थितीही बिकट झाली आहे. एवढं होऊनही जिल्हा प्रशासनाने कुठल्याच उपाययोजना केलेल्या नाही. उलट शेजारच्या कर्नाटकातल्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये कर्नाटक सरकारने चारा छावण्या उभारल्यायत, शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिलंय. वीजही मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे आता या 42 गावांचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी गावकरी करत आहे. या मागणीसाठी जत तालुक्यातील 42 गावातील सरपंच आणि ग्रामस्थांची येत्या आठ दिवसात उमदी येथे बैठक होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 08:50 AM IST

दुष्काळग्रस्त 42 गावांचा राज्याला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा

30 एप्रिल

राज्यात दुष्काळाची परिस्थिती चिघळत चालली आहे. पण सरकार फक्त आश्वासनांचं गाजर दाखवून आपली जबाबदारी पार पाडल्याचा आव आणत असल्याचंच चित्र आहे. सरकारच्या या वागण्याला कंटाळलेल्या सांगलीतल्या जत तालुक्यातली 42 गावं आता महाराष्ट्रालाच सोडचिठ्ठी देण्याचा विचार करत आहे. या गावांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. पाझर तलाव कोरडे पडून दोन महिने झालेत, विहिरी आणि बोरही कोरडे पडलेत. माणसालाच प्यायला पाणी मिळत नाही. तशीच जनावरांची परिस्थितीही बिकट झाली आहे. एवढं होऊनही जिल्हा प्रशासनाने कुठल्याच उपाययोजना केलेल्या नाही. उलट शेजारच्या कर्नाटकातल्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये कर्नाटक सरकारने चारा छावण्या उभारल्यायत, शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिलंय. वीजही मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे आता या 42 गावांचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी गावकरी करत आहे. या मागणीसाठी जत तालुक्यातील 42 गावातील सरपंच आणि ग्रामस्थांची येत्या आठ दिवसात उमदी येथे बैठक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 08:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close