S M L

पालिकेत पराभवाचा रिपोर्ट सोनिया गांधींकडे सादर

30 एप्रिलमहाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज भेट घेतली. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवाचा रिपोर्ट सोनिया गांधींकडे सादर केला आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसमधील महत्वाच्या विषयांवर चर्चा या भेटीत झाल्याची माहिती मिळतेय. मुंबई महापालिकेत काँग्रेसला मोठा पराभवाला सामोरं जावं लागलंय. यंदा मुंबई महापालिकेवर काँग्रेसची सत्ता येणार असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकांच्या प्रचारात केला होता. मात्र, पक्षात पडलेली फूट आणि बंडखोरांनी घेरलेल्या काँग्रेसला पराभवाच्या खाईत ढकलले. पण काँग्रेसच्या नेत्यांनी पराभवाचे खापर राष्ट्रवादीवर फोडले. अलीकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोनियांची भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसमध्ये मोठे फेरबद्दल होण्याचे संकेत देण्यात आले होते. आज काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या भेटीत काय चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 10:53 AM IST

पालिकेत पराभवाचा रिपोर्ट सोनिया गांधींकडे सादर

30 एप्रिल

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज भेट घेतली. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवाचा रिपोर्ट सोनिया गांधींकडे सादर केला आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसमधील महत्वाच्या विषयांवर चर्चा या भेटीत झाल्याची माहिती मिळतेय. मुंबई महापालिकेत काँग्रेसला मोठा पराभवाला सामोरं जावं लागलंय. यंदा मुंबई महापालिकेवर काँग्रेसची सत्ता येणार असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकांच्या प्रचारात केला होता. मात्र, पक्षात पडलेली फूट आणि बंडखोरांनी घेरलेल्या काँग्रेसला पराभवाच्या खाईत ढकलले. पण काँग्रेसच्या नेत्यांनी पराभवाचे खापर राष्ट्रवादीवर फोडले. अलीकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोनियांची भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसमध्ये मोठे फेरबद्दल होण्याचे संकेत देण्यात आले होते. आज काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या भेटीत काय चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close