S M L

सीताराम कुंटे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त

30 एप्रिलमुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सीताराम कुंटे यांची निवड झाली आहे. आज माजी आयुक्त सुबोध कुमार यांचा कार्यकाळ संपला आहे. सीताराम कुंटे सध्या नियोजन खात्याचे सचिव आहे. तसेच कुंटे हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. कुंटे यांची नियुक्तीसाठी अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना डावलण्यात आलंय. अर्थखात्यात असताना कुंटे यांची कामगिरी चांगली गाजली होती. अलीकडेच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं आपली सत्ता कायम ठेवली आहे. आता नव्या नगरसेवकांसह नव्या आयुक्तांची नियुक्ती झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 01:12 PM IST

सीताराम कुंटे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त

30 एप्रिल

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सीताराम कुंटे यांची निवड झाली आहे. आज माजी आयुक्त सुबोध कुमार यांचा कार्यकाळ संपला आहे. सीताराम कुंटे सध्या नियोजन खात्याचे सचिव आहे. तसेच कुंटे हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. कुंटे यांची नियुक्तीसाठी अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना डावलण्यात आलंय. अर्थखात्यात असताना कुंटे यांची कामगिरी चांगली गाजली होती. अलीकडेच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं आपली सत्ता कायम ठेवली आहे. आता नव्या नगरसेवकांसह नव्या आयुक्तांची नियुक्ती झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close