S M L

नागपूरमध्ये रस्त्यांची दुर्दशा

24 नोव्हेंबर, नागपूरप्रशांत कोरटकरराज्यात सर्वात चांगले रस्त्ते असलेलं शहर म्हणून नागपूरचं नाव घेतलं जायचं. पण नागपूरची ही ओळख आता भूतकाळात जमा झालीय. सध्या शहरातल्या बहुतांश रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालीय. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते, असा प्रश्न नागरिकांना पडतोय.नागपुरातल्या सिव्हील लाईन्सच्या या रस्त्यावर नजर टाकली तर आपल्याला वाटेल की शहरातले रस्ते चांगले आहेत. त्याच्या जरा बाजूला असणार्‍या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. 'रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे इथे खूप लोकांचे अपघात झाले आहेत. आता तर या रस्त्यावरून जायची भीती वाटते' असं मुरलीधर डोमरे या नागरिकानं सांगितलं.शहरात चार वर्षापूर्वी आयआरडीपी च्या माध्यमातून कोट्यवधीचे रस्ते तयार करण्यात आले होते. पण दोन वषांर्तच या रस्त्यांचे तीन तेरा वाजले. अधिवेशनाच्या कालात ज्या रस्त्यावरून मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे राजकीय पुढारी प्रवास करणार आहेत, तो रस्ता चमकवण्याचं काम तर जोरात चालू आहे, पण इतर रस्त्यांकडे कोणाचच लक्ष नाही. महापालिकेच्या स्थायी समितीनं खराब रस्त्यांसाठी 16 कोटी रूपये मंजूर केले होते. आता पुन्हा 10 कोटी रूपये खर्च करण्याचा महापालिकेचा विचार असल्याची माहिती नागपूरच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कृष्णाराव खोपडे यांनी दिली. राज्यसरकारच्या रस्ते विकासाच्या माध्यमातून 2001 मध्ये नागपूरमध्ये 350 कोटी रूपयांच्या कामाला मंजूरी देण्यात आली. 2004 पर्यंत 175 कोटीच्या रस्त्यांची निर्मिती झाली. यात कंत्राटदाराला तीन वषांर्पर्यत मेंटेनन्सची जबाबदारी होती. पण तीन वर्ष संपली आहेत आणि रस्त्यांचा बट्याबोळ झालाय. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. राज्यसरकारच्या रस्ते विकासाच्या माध्यमातून 2001 मध्ये नागपूरमध्ये 350 कोटी रूपयांच्या कामाला मंजूरी देण्यात आली. 2004 पर्यंत 175 कोटीच्या रस्त्यांची निर्मिती झाली. यात कंत्राटदाराला तीन वषांर्पर्यत मेंटेनन्सची जबाबदारी होती. पण तीन वर्ष संपली आहेत आणि रस्त्यांचा बट्याबोळ झालाय. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 01:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close