S M L

सतीश शेट्टी हत्येप्रकरणी पॉलिग्राफ टेस्टला परवानगी

02 मेआरटीआयचे कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासाला आता वेगळं वळण लागलंय. सीबीआयने संशयावरून आयआरबी (I.R.B)चे संचालक वीरेंद्र म्हैसकर , उद्योजक नितिन साबळे, निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह 23 जणांची पॉलीग्राफीक टेस्ट करायची परवानगी कोर्टाकडून मिळवली आहे. 13 जानेवारी 2010 रोजी सतीश शेट्टी यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी विजय दाभाडे याच्यासह तीन संशयित हल्लेखोरांनाही अटक केली. पण पोलीस या प्रकरणातील बड्या धेंडांना वाचवत असल्याच्या संशयावरून सतीश शेट्टीचे भाऊ संदीप यांनी हायकोर्टाचं दार ठोठावलं. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. आता दोन वर्षांनंतर सीबीआय 23 जणांची पॉलिग्राफ टेस्ट होणारय. आता तब्बल 2 वर्षांनंतर सीबीआयनं या प्रकरणातील एकूण 23 जणांची पॉलीग्राफ टेस्ट करायचा निर्णय घेतला आहे. संदीप शेट्टी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तर निवृत्त पोलीस पीआय भाऊसाहेब आंधळकर यांनी पॉलीग्राफ काय तर नार्को टेस्टही करा असं म्हणत पोलीस दलातील काही अधिकार्‍याडंही बोट दाखवलं आहे. सतीश सेट्टी यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून अनेक बड्या बड्या धेंडांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यातल्या नक्की कुणी त्यांचा काटा काढला हे कळत नाही. तपास यंत्रणा अजूनही अंधारातंच चाचपडतायत, हेच 2 वर्षानंतर संशयितांच्या पॉलीग्राफीक चाचण्या करण्याच्या निर्णयावरून पुन्हा अधोरेखीत झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2012 09:14 AM IST

सतीश शेट्टी हत्येप्रकरणी पॉलिग्राफ टेस्टला परवानगी

02 मे

आरटीआयचे कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासाला आता वेगळं वळण लागलंय. सीबीआयने संशयावरून आयआरबी (I.R.B)चे संचालक वीरेंद्र म्हैसकर , उद्योजक नितिन साबळे, निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह 23 जणांची पॉलीग्राफीक टेस्ट करायची परवानगी कोर्टाकडून मिळवली आहे.

13 जानेवारी 2010 रोजी सतीश शेट्टी यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी विजय दाभाडे याच्यासह तीन संशयित हल्लेखोरांनाही अटक केली. पण पोलीस या प्रकरणातील बड्या धेंडांना वाचवत असल्याच्या संशयावरून सतीश शेट्टीचे भाऊ संदीप यांनी हायकोर्टाचं दार ठोठावलं. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. आता दोन वर्षांनंतर सीबीआय 23 जणांची पॉलिग्राफ टेस्ट होणारय. आता तब्बल 2 वर्षांनंतर सीबीआयनं या प्रकरणातील एकूण 23 जणांची पॉलीग्राफ टेस्ट करायचा निर्णय घेतला आहे.

संदीप शेट्टी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तर निवृत्त पोलीस पीआय भाऊसाहेब आंधळकर यांनी पॉलीग्राफ काय तर नार्को टेस्टही करा असं म्हणत पोलीस दलातील काही अधिकार्‍याडंही बोट दाखवलं आहे.

सतीश सेट्टी यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून अनेक बड्या बड्या धेंडांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यातल्या नक्की कुणी त्यांचा काटा काढला हे कळत नाही. तपास यंत्रणा अजूनही अंधारातंच चाचपडतायत, हेच 2 वर्षानंतर संशयितांच्या पॉलीग्राफीक चाचण्या करण्याच्या निर्णयावरून पुन्हा अधोरेखीत झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2012 09:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close