S M L

शिवसैनिकांनी ठोकलं जातपडताळणी कार्यालयाला टाळं

30 एप्रिलजातपडताळणी कार्यालयातल्या अनागोंदी कारभाराला कंटाळून जातपडताळणी विभागाच्या कार्यालयाला आज शिवसैनिकांनी टाळं ठोकलं. अर्जदारांना योग्य वेळेत जातीचे दाखले मिळत नाहीत, त्यामुळे सामान्य लोकांचे हाल होताहेत. या निषेधार्थ शिवसैनिकांनी या विभागाच्या अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी या कार्यालयावर मोर्चा काढला. पण यावेळी एकही अधिकारी कार्यालयात हजर नव्हता. त्यामुळे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि कार्यकर्त्यांनी या कार्यालयाला टाळे ठोकले. तसेच या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 03:05 PM IST

शिवसैनिकांनी ठोकलं जातपडताळणी कार्यालयाला टाळं

30 एप्रिल

जातपडताळणी कार्यालयातल्या अनागोंदी कारभाराला कंटाळून जातपडताळणी विभागाच्या कार्यालयाला आज शिवसैनिकांनी टाळं ठोकलं. अर्जदारांना योग्य वेळेत जातीचे दाखले मिळत नाहीत, त्यामुळे सामान्य लोकांचे हाल होताहेत. या निषेधार्थ शिवसैनिकांनी या विभागाच्या अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी या कार्यालयावर मोर्चा काढला. पण यावेळी एकही अधिकारी कार्यालयात हजर नव्हता. त्यामुळे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि कार्यकर्त्यांनी या कार्यालयाला टाळे ठोकले. तसेच या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 03:05 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close