S M L

कोकण रेल्वेचं मुख्यालय गोव्याच्या मार्गावर

02 एप्रिलकोकण रेल्वे महामंडळाचे मुख्यालय महाराष्ट्रातून गोव्याला हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोकण रेल्वेचं मुख्यालय सध्या बेलापूरमध्ये आहे. तिथं दीड हजार कर्मचारी आहेत. हे मुख्यालय मडगावला हलवावं अशी विनंती गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळाने रेल्वे मंत्रालयाला केली होती. डिसेंबर 2011 मध्ये तत्कालीन कामत यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना तसं पत्र लिहिलं होतं. कोकण रेल्वे महामंडळामध्ये सध्या महाराष्ट्र राज्याचे 22 % शेअर्स, तर गोव्याचे 6% शेअर्स आहेत. महाराष्ट्राचे शेअर्स सर्वाधिक असूनही मुख्यालय गोव्याला हलवण्याचा घाट घातला जातोय. बेलापूर कार्यालयात महामंडळाच्या संचालक मंडळाची मुख्यालय स्थलांतर करण्याबाबत बैठक झाली. पण या बैठकीला महाराष्ट्राचा प्रतिनिधीच उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2012 12:39 PM IST

कोकण रेल्वेचं मुख्यालय गोव्याच्या मार्गावर

02 एप्रिल

कोकण रेल्वे महामंडळाचे मुख्यालय महाराष्ट्रातून गोव्याला हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोकण रेल्वेचं मुख्यालय सध्या बेलापूरमध्ये आहे. तिथं दीड हजार कर्मचारी आहेत. हे मुख्यालय मडगावला हलवावं अशी विनंती गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळाने रेल्वे मंत्रालयाला केली होती. डिसेंबर 2011 मध्ये तत्कालीन कामत यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना तसं पत्र लिहिलं होतं. कोकण रेल्वे महामंडळामध्ये सध्या महाराष्ट्र राज्याचे 22 % शेअर्स, तर गोव्याचे 6% शेअर्स आहेत. महाराष्ट्राचे शेअर्स सर्वाधिक असूनही मुख्यालय गोव्याला हलवण्याचा घाट घातला जातोय. बेलापूर कार्यालयात महामंडळाच्या संचालक मंडळाची मुख्यालय स्थलांतर करण्याबाबत बैठक झाली. पण या बैठकीला महाराष्ट्राचा प्रतिनिधीच उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2012 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close