S M L

गृहमंत्र्यांनी दिल्या नक्षलग्रस्त गावांना भेटी

03 मेलोकप्रतिनिधींची हत्या आणि नक्षलवाद्यांचा अल्टीमेटम यामुळे गडचिरोली जिल्हात कधी नव्हे तेवढी दहशत पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि लोकप्रतिनीधींचे मनौधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्री आर आर पाटील यांनी नक्षलग्रस्त एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात स्वत: फिरुन भेटी दिल्यात. या भागात आर.आर.पाटील यांनी जनतेशी आणि जवानाशी संवाद साधला. गृहमंत्री थेट हेलिकॉप्टरद्वारे एटापल्ली इथं गेलेत. नक्षलवाद्यांनी दोन आठवड्यांपूर्वी हत्या केलेल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी अटकमवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी आणि पेढांरी गावाला पाटील यांनी भेटी दिल्यात. पाटील यांनी नक्षलविरोधी अभियानाची माहिती घेतली. त्यानंतर ते जाराबंडी पोलीस मदत केंद्रात गेलेत. तिथं त्यांनी जवानांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांचा पुढचा स्टॉप होता अहेरी. अहेरी इथं प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2012 10:54 AM IST

गृहमंत्र्यांनी दिल्या नक्षलग्रस्त गावांना भेटी

03 मे

लोकप्रतिनिधींची हत्या आणि नक्षलवाद्यांचा अल्टीमेटम यामुळे गडचिरोली जिल्हात कधी नव्हे तेवढी दहशत पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि लोकप्रतिनीधींचे मनौधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्री आर आर पाटील यांनी नक्षलग्रस्त एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात स्वत: फिरुन भेटी दिल्यात. या भागात आर.आर.पाटील यांनी जनतेशी आणि जवानाशी संवाद साधला.

गृहमंत्री थेट हेलिकॉप्टरद्वारे एटापल्ली इथं गेलेत. नक्षलवाद्यांनी दोन आठवड्यांपूर्वी हत्या केलेल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी अटकमवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी आणि पेढांरी गावाला पाटील यांनी भेटी दिल्यात. पाटील यांनी नक्षलविरोधी अभियानाची माहिती घेतली. त्यानंतर ते जाराबंडी पोलीस मदत केंद्रात गेलेत. तिथं त्यांनी जवानांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांचा पुढचा स्टॉप होता अहेरी. अहेरी इथं प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2012 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close