S M L

मालेगावमध्ये 10 हजार कोंबड्यांचा अचानक मृत्यू

03 मेमालेगावात पोल्ट्री फार्म मधील 10 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लेंढाणे गावातील एका पोल्ट्री फार्ममधील या कोंबड्या एका रात्रीतून मृत झाल्या आहेत. याच गावातील इतर पोल्ट्रीफार्मधेही कोंबड्या मृत होण्यास सुरुवात झाली आहे. कोंबड्यांच्या मृत होण्याचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसून मृत कोंबड्यांचे सॅम्पल नाशिकच्या पशुवैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आले आहे. अचानक झालेल्या या घटनेनं मालेगावातील पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झाले आहे. दुषित पाण्यामुळे किंवा साथीच्या रोगांचा फटका या कोंबड्यांना बसला आहे का हे आता तपासणीअंतीच स्पष्ट होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2012 12:37 PM IST

मालेगावमध्ये 10 हजार कोंबड्यांचा अचानक मृत्यू

03 मे

मालेगावात पोल्ट्री फार्म मधील 10 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लेंढाणे गावातील एका पोल्ट्री फार्ममधील या कोंबड्या एका रात्रीतून मृत झाल्या आहेत. याच गावातील इतर पोल्ट्रीफार्मधेही कोंबड्या मृत होण्यास सुरुवात झाली आहे. कोंबड्यांच्या मृत होण्याचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसून मृत कोंबड्यांचे सॅम्पल नाशिकच्या पशुवैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आले आहे. अचानक झालेल्या या घटनेनं मालेगावातील पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झाले आहे. दुषित पाण्यामुळे किंवा साथीच्या रोगांचा फटका या कोंबड्यांना बसला आहे का हे आता तपासणीअंतीच स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2012 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close