S M L

अण्णांच्या 'मिशन जनलोकायुक्त'ला 'कमळ' वाहिले !

दीप्ती राऊत, नाशिक02 मेसक्षम लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांचं राज्यभर जागृती अभियान सुरू झालंय. भ्रष्टाचार निर्मूलन न्यासाच्या बॅनरखाली हे आंदोलन होत असलं तरी यातले पडद्यामागचे सूत्रधार आहेत ते भाजपचे कार्यकर्ते. शिर्डीच्या पहिल्या सभेत तर भाजपचे पदाधिकारी उघडपणे अण्णांसोबत होते. आधी दिल्ली, मग मुंबई आणि आता महाराष्ट्र... अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा तिसरा अंक सुरू झाला तो शिर्डीतल्या गोंदकर मैदानावर. अण्णांच्या आंदोलनाला भाजप पडद्यामागून मदत करतं, असा आरोप आजपर्यंत काँग्रेसने अनेकवेळा केला. पण शिर्डीत झालेल्या सभेत पहिल्यांदाच भाजपने उघडपणे मदत केली. आणि अण्णांनी ती स्वीकारलीही. जनलोकायुक्तासाठी अण्णांनी घेतलेल्या पहिल्या सभेचं व्यवस्थापन केलं होतं भाजपचे नगरसेवक राजेंद्र गोंदकर यांनी. सभेचं सूत्रसंचलन करत होते भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा मुलगा विराट पुरोहीत. शिर्डीत अण्णांच्या स्वागतासाठी मिरवणूकही काढण्यात आली होती. त्याचं संयोजन केलं होतं, भाजपच्या युवा मोर्चाते जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी.अण्णांच्या सभेत भाजपचा ना कुठे झेंडा होता ना बॅनर, पण लगबग करत झटणारे कार्यकर्ते भाजपचे होते. अण्णांचा हा दौरा सुरू होण्यापूर्वीच भाजपनेते एकनाथ खडसे अहमदनगरमध्ये त्यांना भेटले आणि त्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.अशी मदत घेण्यात अण्णांना काही वावगं वाटत नाही. जे मदत करतील, त्या सर्वांची मदत घेऊ, असं अण्णा म्हणाले. मी सगळ्याच पक्षांचा पाठिंबा मागितला आहे. सगळ्यांशी चर्चा करणं ही माझी भूमिका आहे, भाजपचा पाठिंबा घेतला त्यात टीका करण्यासारखं काय? असंही अण्णा म्हणतात.सक्षम लोकायुक्ताला पाठिंबा न देणार्‍या पक्षाला सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन अण्णा करतायत. काँग्रेसला विरोध करणारे अण्णा भाजपला जवळचे वाटले नसते, तरच नवल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2012 05:00 PM IST

अण्णांच्या 'मिशन जनलोकायुक्त'ला 'कमळ' वाहिले !

दीप्ती राऊत, नाशिक

02 मे

सक्षम लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांचं राज्यभर जागृती अभियान सुरू झालंय. भ्रष्टाचार निर्मूलन न्यासाच्या बॅनरखाली हे आंदोलन होत असलं तरी यातले पडद्यामागचे सूत्रधार आहेत ते भाजपचे कार्यकर्ते. शिर्डीच्या पहिल्या सभेत तर भाजपचे पदाधिकारी उघडपणे अण्णांसोबत होते.

आधी दिल्ली, मग मुंबई आणि आता महाराष्ट्र... अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा तिसरा अंक सुरू झाला तो शिर्डीतल्या गोंदकर मैदानावर. अण्णांच्या आंदोलनाला भाजप पडद्यामागून मदत करतं, असा आरोप आजपर्यंत काँग्रेसने अनेकवेळा केला. पण शिर्डीत झालेल्या सभेत पहिल्यांदाच भाजपने उघडपणे मदत केली. आणि अण्णांनी ती स्वीकारलीही. जनलोकायुक्तासाठी अण्णांनी घेतलेल्या पहिल्या सभेचं व्यवस्थापन केलं होतं भाजपचे नगरसेवक राजेंद्र गोंदकर यांनी. सभेचं सूत्रसंचलन करत होते भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा मुलगा विराट पुरोहीत. शिर्डीत अण्णांच्या स्वागतासाठी मिरवणूकही काढण्यात आली होती. त्याचं संयोजन केलं होतं, भाजपच्या युवा मोर्चाते जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी.

अण्णांच्या सभेत भाजपचा ना कुठे झेंडा होता ना बॅनर, पण लगबग करत झटणारे कार्यकर्ते भाजपचे होते. अण्णांचा हा दौरा सुरू होण्यापूर्वीच भाजपनेते एकनाथ खडसे अहमदनगरमध्ये त्यांना भेटले आणि त्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

अशी मदत घेण्यात अण्णांना काही वावगं वाटत नाही. जे मदत करतील, त्या सर्वांची मदत घेऊ, असं अण्णा म्हणाले. मी सगळ्याच पक्षांचा पाठिंबा मागितला आहे. सगळ्यांशी चर्चा करणं ही माझी भूमिका आहे, भाजपचा पाठिंबा घेतला त्यात टीका करण्यासारखं काय? असंही अण्णा म्हणतात.सक्षम लोकायुक्ताला पाठिंबा न देणार्‍या पक्षाला सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन अण्णा करतायत. काँग्रेसला विरोध करणारे अण्णा भाजपला जवळचे वाटले नसते, तरच नवल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2012 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close