S M L

राष्ट्रपतीपदासाठी अन्सारींचे नाव आघाडीवर

03 मेराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आता यूपीएचं पारडं जड दिसतंय. एनडीएमध्ये फूट पडल्यानं काँग्रेसनं सुचवलेला उमेदवार राष्ट्रपती भवनात पोहोचेल, अशी शक्यता आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यापैकी एक जण पुढचा राष्ट्रपती असू शकतो.उपराष्ट्रपती हमीद अन्सारी किंवा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी या दोघांपैकी एक जण पुढील राष्ट्रपती होण्याची दाट शक्यता आहे. सध्यातरी हमीद अन्सारी या शर्यतीत पुढे आहेत. काँग्रेसचे क्रायसिस मॅनेजर प्रणव मुखर्जी यांना सोडायला पक्षातले अनेक जण इच्छुक नाहीत ही अन्सारींसाठी जमेची बाजू आहे.विरोधकांच्या गोटातूनही यूपीएसाठी थोडासा दिलासा मिळाला आहे. एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष संयुक्त जनता दलानं यूपीएनं सुचवलेया उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. सुरुवातीला एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव पुढं करणार्‍या समाजवादी पक्षानंही आता आपली भूमिका बदलली आहे. राजकीय पार्श्वभूमीच्या व्यक्तीला त्यांनी आपलं समर्थन देऊ केलं आहे. पण यूपीएच्याच ममता बॅनर्जींनी मात्र आपले पत्ते झाकून ठेवले आहेत.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र अजूनही कुठल्याच नावावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्व मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतरच त्या आपलं मत व्यक्त करतील. सध्यातरी परिस्थिती यूपीएच्या बाजूनं दिसतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2012 03:05 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी अन्सारींचे नाव आघाडीवर

03 मे

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आता यूपीएचं पारडं जड दिसतंय. एनडीएमध्ये फूट पडल्यानं काँग्रेसनं सुचवलेला उमेदवार राष्ट्रपती भवनात पोहोचेल, अशी शक्यता आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यापैकी एक जण पुढचा राष्ट्रपती असू शकतो.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी किंवा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी या दोघांपैकी एक जण पुढील राष्ट्रपती होण्याची दाट शक्यता आहे. सध्यातरी हमीद अन्सारी या शर्यतीत पुढे आहेत. काँग्रेसचे क्रायसिस मॅनेजर प्रणव मुखर्जी यांना सोडायला पक्षातले अनेक जण इच्छुक नाहीत ही अन्सारींसाठी जमेची बाजू आहे.

विरोधकांच्या गोटातूनही यूपीएसाठी थोडासा दिलासा मिळाला आहे. एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष संयुक्त जनता दलानं यूपीएनं सुचवलेया उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. सुरुवातीला एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव पुढं करणार्‍या समाजवादी पक्षानंही आता आपली भूमिका बदलली आहे. राजकीय पार्श्वभूमीच्या व्यक्तीला त्यांनी आपलं समर्थन देऊ केलं आहे. पण यूपीएच्याच ममता बॅनर्जींनी मात्र आपले पत्ते झाकून ठेवले आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र अजूनही कुठल्याच नावावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्व मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतरच त्या आपलं मत व्यक्त करतील. सध्यातरी परिस्थिती यूपीएच्या बाजूनं दिसतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2012 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close