S M L

'पाण्यासाठी हाक द्या' मोहिमेला उदंड प्रतिसाद

03 एप्रिल'गावात पाणी नाही, चारा नाही, 20-20 दिवस पाणी येत नाही, गावात पाण्याचा टँकरही पाच दिवसांनी येतो. निकृष्ट चारा मिळतो, सरकारी अधिकारी टोलवाटोलवी करतात, गावात रस्ते नाहीत, रोजगार नाहीय, समस्यांचं राजकारण केलं जातंय अशा आणि अनेक समस्या नागरिकांनी आयबीएन-लोकमतकडे मांडल्या. या सर्व समस्या ऐकून सरकारला लाज कशी वाटत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. आयबीएन लोकमतने आजपासून 'पाण्यासाठी हाक द्या' ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दिवसभरात अनेक लोकांनी फोनवरून आपल्या समस्या मांडल्या. अहमदनगर, सातारा, उस्मानाबाद, ठाणे, सोलापूर, सांगली, लातूर, नाशिक , बीड, पुणे, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतून आम्हाला फोन आले. आपण दिलेल्या या प्रतिसादाला आम्ही आभारी आहोत असं म्हणणं हे औपचारिक ठरले पण खरी लढाई आहे ती दुष्काळाविरोधात त्यामुळे तुमची समस्या ही सत्ताधार्‍यांना ऐकवण्यासाठी फोन उचला. आयबीएन लोकमतच्या या मोहिमेची दखल घेत आता राज्य सरकारच्या वतीने ही हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. तुमच्या भागात जर पाणी टंचाई असेल, तर तुम्ही थेट संपर्क साधा राज्य सरकारच्या हेल्पलाईनला. फोन करा: संतोष गावडे आणि सुबोध भारत, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय- 022 22023800 - 022 22025138 - 022 22817064 - 022 22817078 आयबीएन लोकमतची हेल्पलाईनपाण्यासाठी हाक द्या !तुमच्याकडे पाण्याचा टँकर येत नसेल किंवाचारा पोहोचत नसेल तर आम्हाला कळवा.फोन नं. 9930360498 ई मेल - feedback@ibnlokmat.tv.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2012 05:18 PM IST

'पाण्यासाठी हाक द्या' मोहिमेला उदंड प्रतिसाद

03 एप्रिल

'गावात पाणी नाही, चारा नाही, 20-20 दिवस पाणी येत नाही, गावात पाण्याचा टँकरही पाच दिवसांनी येतो. निकृष्ट चारा मिळतो, सरकारी अधिकारी टोलवाटोलवी करतात, गावात रस्ते नाहीत, रोजगार नाहीय, समस्यांचं राजकारण केलं जातंय अशा आणि अनेक समस्या नागरिकांनी आयबीएन-लोकमतकडे मांडल्या. या सर्व समस्या ऐकून सरकारला लाज कशी वाटत नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

आयबीएन लोकमतने आजपासून 'पाण्यासाठी हाक द्या' ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दिवसभरात अनेक लोकांनी फोनवरून आपल्या समस्या मांडल्या. अहमदनगर, सातारा, उस्मानाबाद, ठाणे, सोलापूर, सांगली, लातूर, नाशिक , बीड, पुणे, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतून आम्हाला फोन आले. आपण दिलेल्या या प्रतिसादाला आम्ही आभारी आहोत असं म्हणणं हे औपचारिक ठरले पण खरी लढाई आहे ती दुष्काळाविरोधात त्यामुळे तुमची समस्या ही सत्ताधार्‍यांना ऐकवण्यासाठी फोन उचला. आयबीएन लोकमतच्या या मोहिमेची दखल घेत आता राज्य सरकारच्या वतीने ही हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे.

तुमच्या भागात जर पाणी टंचाई असेल, तर तुम्ही थेट संपर्क साधा राज्य सरकारच्या हेल्पलाईनला. फोन करा: संतोष गावडे आणि सुबोध भारत, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय- 022 22023800 - 022 22025138 - 022 22817064 - 022 22817078

आयबीएन लोकमतची हेल्पलाईनपाण्यासाठी हाक द्या !

तुमच्याकडे पाण्याचा टँकर येत नसेल किंवाचारा पोहोचत नसेल तर आम्हाला कळवा.फोन नं. 9930360498 ई मेल - feedback@ibnlokmat.tv.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2012 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close